Java 8 ची वैशिष्टये – Java 8 Features In Marathi

Java 8 ची वैशिष्टये – Java 8 Features In Marathi

आपल्या सर्वानाच माहीत असेल की 18 मार्च 2014 रोजी Oracle कडुन Java चे New Version Java 8 हे जारी केले होते.

हे Software Development Platform साठी Java चे एक क्रांतीकारी Publication होते.ज्यात Java Programming, Jvm Tools, Library मधील इतर अपग्रेड देखील यात समाविष्ट करण्यात आले आहेत.

आजच्या लेखात आपण ह्याच सर्व वैशिष्टयांचा आढावा घेणार आहोत.म्हणजेच Java 8 हे New Version Programming साठी कोणकोणती वैशिष्टये आपणास प्रदान करते हे आपण आज थोडक्यात जाणुन घेणार आहोत.

Java 8 ची वैशिष्टये कोणकोणती आहेत? Java 8 Features In Marathi

Java 8 ह्या New Version ची वैशिष्टये पुढीलप्रमाणे आहेत –

● Optional Class :

● Collector Class :

● For Each ()Method :

● Nashorn JavaScript Engine :

● Parallel Array Sorting :

● Type And Repeating Annotations :

● IO Enhancements :

● Concurrency Enhancements :

● Lamda Expression :

● Method References :

● Functional Interface :

● Stream Api :

● Default Methods :

● Base 64 Encode Decode :

● Static Method In Interface :

1) Method References :

Java 8 मध्ये Method Reference नावाचे एक नवीन Feature Add केलेले आपणास दिसुन येते.

Method Reference चा उपयोग Functional Interface च्या पद्धतीचा संदर्भ देण्यासाठी केला जातो.

हे Lamda Expression चे एक संक्षिप्त आणि सोपे स्वरूप आहे.

प्रत्येक वेळी जेव्हा आपण फक्त Method Refer करण्यासाठी Lamda Expression चा वापर करत असतो तेव्हा आपण आपले Lamda Expression
Method Reference सोबत बदलू शकतो.

See also  इंस्टाग्राम अकाऊंट कसे डिलीट करावे?- How To Delete Instagram Account

Method Reference चे तीन प्रमुख प्रकार पडत असतात.

● Reference To Static Method

● Reference To Instance Method

● Reference To Constructor

2) Lamda Expression :

Lamda Expression हा एक Function तसेच Expression चा प्रकार आहे.

Lambda Expression हे आपणास आपला Code Functional Style मध्ये लिहिण्यास मदत करत असते.

हे आपणास असे Clear आणि Concise Way Provide करते म्हणजेच आपल्याला असा एक स्पष्ट आणि संक्षिप्त मार्ग देते ज्याचा वापर करून आपण SAM(Single Abstract Method) Interface हे Expression चा वापर करून Implement करू शकतो.

हे Collection Library मध्ये देखील खुप फायदेशीर ठरत असते.यात Lambda Expression हे आपणास डेटाला Filter आणि Extract करायला मदत करत असते.

3) Default Methods :

Java 8 मधील Default Method जिला Defender Method असे देखील म्हटले जाते.

हे Java Developers ला त्यांच्या कोडमधील Current Interface मध्ये Current Implementation Break न करता New Method Add करण्याची Permission देते.

4) Base 64 Encode Decode :

Base 64 Binary To Text Encoding System आहे.जे Binary Data ला Represent करत असते. आणि ASCII String Format मध्ये रेडिक्स-64 Representation मध्ये Translation करून त्याचे प्रतिनिधित्व करते.

तसेच हे Base 64 Encoding Scheme वापरून Base 64 Encode केलेल्या String ला नव्याने Allocated केलेल्या Byte Array मध्ये Decode करते.

5) Static Method In Interface :

Static Method ही Method आहे जी कोणत्याही Object च्या ऐवजी परिभाषित केलेल्या Class शी संबंधित आहे.

Class चा प्रत्येक Instance त्याच्या Static Method Share करतो.

Static Method In Interface हा Interface Class चा भाग असतो.Class याला Implement तसेच Override करू शकत नाही. तर Class Default Method Override करू शकतो.

6) Optional Class :

Optional हे एक Container Object आहे.ज्याचा वापर Not Null Object समाविष्ट करण्यासाठी केला जातो.

See also  चंद्रयान ३ ची लॅडिग तारीख शक्यतो २७ आॅगस्ट पर्यंत पुढे ढकलली जाणार - Chandrayaan-3 landing may get postponed to August 27

Optional Object चा वापर Absent Value सोबत Null Represent करण्यासाठी केला जातो.

7) Collector Class :

Collector Class हा एक Final Class असतो जो Object Class ला Extend करत असतो.हा Reduction Operation Provide करतो.

जसे की संग्रहांमध्ये घटक जमा करणे (Accumulating Elements Into Collections) विविध निकषांनुसार घटकांचा सारांश करणे Summarizing Elements According To Various Criteria).

8) For Each ()Method :

प्रत्येक Elements ची पुनरावृत्ती करण्यासाठी Java ही एक New Method Provide करते.हे Iterable आणि Stream Interface मध्ये Define करण्यात आले आहे.

Iterable Interface मध्ये Defined केलेली ही एक Default Method आहे.ही Method Functional Interface हा एकच Parameter चा स्वीकार करते.

त्यामुळे आपण Argument म्हणुन Lamda Expression Pass करू शकतो.

9) Nashorn JavaScript Engine :

Nashorn हे एक Java Script Engine आहे.हे JVM (Java Virtual Machine) वर JavaScript कोड Dynamic पदधतीने Execute करण्यासाठी वापरले जाते.

Java हे Command Line Tool Jjs Provide करते. जे JavaScript कोड Execute करण्यासाठी वापरले जाते.

आपण Jjs कमांड लाइन टूलचा वापर करून आणि Java Source Code मध्ये Embed करून JavaScript Code Execute करू शकतो.

10) Parallel Array Sorting :

Java ने एक New Method शोधुन काढली आहे.जिचे नाव Parallel Sort() असे आहे.

हे Array Elements ची Parallel Sorting करते.

11) Type And Repeating Annotations :

Java 8 ने त्याच्या Prior Annotations Topic मध्ये दोन New Feature Add केले आहेत.Type And Repeating Annotations.

सुरूवातीच्या Java Version मध्ये आपण फक्त आपण Annonation हे Declaration साठीच Apply करता येत होते.

पण Java 8 Release झाल्यानंतर आपल्याला कोणत्याही प्रकारच्या Use साठी Annotation Apply करता येऊ लागले.

12) IO Enhancements :

JDK_HOME>/Jre/Lib/Charsets.Jar फाइलचा आकार कमी केला आहे.

Java.Lang.String(Byte[], ∗) Constructor आणि Java.Lang.String.Getbytes() Methodसाठी Performance सुधारला आहे.

See also  या २६५ हून अधिक शहरांमध्ये Airtel 5G, शहरांची संपूर्ण यादी । Airtel 5G Services Available Cities Names In Marathi

13)Concurrency Enhancements :

Java.Util. Concurrent Package कडुन Two New Interface आणि Four New Class जोडण्यात आले आहे.

14) Functional Interface :

Functional Interface ला Single Abstract Method(SAM) असे देखील म्हटले जाते.

हे Java मधील एक New Feature आहे.जे Functional Programming Approach ला Achive करण्यास Help करते.

एक Interface ज्यात एक Abstract Method असते त्याला Functional Interface असे म्हणतात.यात कितीही Default तसेच Static Method असु शकतात.

पण यात फक्त एकच Abstract Method असु शकते.हे Object Class च्या Method देखील Declare करू शकते.

15) Stream API :

Java 8 मधील New Function Stream API चा वापर Objects च्या Collection वर Process करण्यासाठी केला जात असतो.

Stream हा आँब्जेक्टचा एक Sequence असतो.जो हवा असलेला Desired Result देण्यासाठी पाइपलाइन केलेल्या विविध Methods ला Support करतो.

Java Stream हे Data Structure नाहीये ते Collection, Array तसेच I/O Channels मधुन Input घेण्याचे काम करते.Stream हे Original Data Structure ला Change करत नसते.ते फक्त Pipeline केलेल्या Method नुसार Result देण्याचे काम करते.

java learning

1 thought on “Java 8 ची वैशिष्टये – Java 8 Features In Marathi”

Comments are closed.