महाराष्ट्र राज्याविषयी महत्वपुर्ण माहिती – Maharashtra information in Marathi

Table of Contents

महाराष्ट्र संपूर्ण माहिती – Maharashtra information in Marathi

महाराष्ट्र शब्दाचा अर्थ आणि त्याची उत्पत्ती :

 महाराष्ट्र आणि मराठी भाषेचा उदय नेमका कधी आणि केव्हा झाला या बाबत अनेक मतभिन्नता असलेली आपणास आढळुन येते.

  • इ.स.पूर्व दुसऱ्या शतकातील सातवाहनाच्या नाणेघाटातील लेखामध्ये महारठ्ठ असा उल्लेख केलेला आपणास आढळुन येतो.
  • महाराष्ट्र ह्या नावाचा सर्वात प्राचीन पुरावा हा आपणास सम्राट अशोक यांच्या शिलालेखामध्ये आढळुन येतो. या शिलालेखामध्ये या प्रदेशाचे महारडु असे नाव ठेवण्यात आले होते.या नावावरून मग आधुनिक काळात ह्याच प्रदेशाचे महाराष्ट्र राज्य असे नामकरण करण्यात आले होते.
  • उत्तरेस आर्य आणि दक्षिणेस द्रविड लोक राहायचे.यात विंध्य पर्वताच्या दक्षिणेच्या प्रदेशाला दक्षिणपथ म्हटल जायचे यामध्ये कलिंग,आंध्र,सौराष्ट्र,आर्यावर्त,अपरांत,कुंतल व देवराष्ट्र इ. भू-भागांचा उल्लेख करण्यात आलेला आपणास आढळुन येतो.
  • सर्वप्रथम कोटील्याच्या अर्थशास्त्र या ग्रंथात अश्मक व अपरांत येथील पावसाच्या प्रमाणाचा उल्लेख करण्यात आला आहे.
  • इ. स. पुर्वी तिसर्‍या शतकात सम्राट अशोक यांच्या काळात महारड़ प्रदेशात धर्मोपदेशकांना बौद्ध धर्माचा प्रचार करण्यासाठी पाठवल्याचा उल्लेख आपणास शिलालेखातून प्राप्त होतो.

महाराष्ट्र स्थापना व इतिहास

1. महाराष्ट्र राज्याची स्थापना १ मे १९६० ह्या कालखंडात करण्यात आली होती.
2. महाराष्टाची राजधानी ही मुंबई शहर आहे.
3. महाराष्टाची राज्यभाषा ही मराठी आहे.
4. महाराष्टात एकुण ३६ जिल्हे आहेत.
5. महाराष्टातील एकुण ३५८ तालुके आहेत.
6. महाराष्टात एकूण २८,८१३ग्रामपंचायती आहेत.
7. महाराष्टात एकूण ३५५ पंचायत समित्या आहेत.
8. महाराष्टातील एकुण जिल्हापरिषद ३४ आहेत.
9. महाराष्टातील विधानसभा आमदार २८८ आहेत
10. महाराष्टातील विधानपरिषद आमदार ७८ आहेत.
11. महाराष्टातील लोकसभा सदस्य एकुण ४८ आहेत
12. लोकसंख्येच्या बाबतीत दुसरा क्रमांक लागतो.
13. महाराष्टाचा क्षेत्रफळाच्या दृष्टीने तिसरा क्रमांक लागतो.
14. महाराष्ट्रात सर्वात कमी लोकसंख्या सिंधुदुर्ग येथे आहे८.५० लाख
15. महाराष्ट्रात सर्वात जास्त जंगल गडचिरोली जिल्हयात आहे.
16. महाराष्ट्रात सर्वात कमी जंगल बीड जिल्हयात आहे.
17. महाराष्ट्रामध्ये सगळयात जास्त तलाव गोंदिया जिल्हयात आहे.
18. महाराष्ट्रात अहमदनगर जिल्हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा आहे.
19. महाराष्ट्रात क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान जिल्हा मुंबई आहे.
20. महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाई आहे -१६४६ मी.
21. गोदावरी महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी आहे.
22. महाराष्ट्रात सर्वात जास्त समुद्रकिनारे रत्नागिरी जिल्हयात आहे
23. जगातील पहिले जैव तंत्रज्ञान विद्यापीठ नागपुर येथे आहे.
24. पहिला संपुर्ण डिजीटल जिल्हा नागपुर आहे. -ऑक्टोबर २०१६
25. महाराष्ट्र राज्याची स्थापना ही 1 मे 1960 रोजी झाली होती आणि स्थापनेच्या वेळेस महाराष्ट्रात 26 जिल्हे,235 तालुके आणि 4 प्रशासकीय विभाग होते.
26. सध्याच्या स्थितीत महाराष्ट्रात एकूण 36 जिल्हे, 355 तालुके,535 शहरे,43663 खेडी,6 प्रशासकीय विभागांचा समावेश असलेला आपणास दिसुन येतो.

महाराष्टातील प्रशासकीय विभागात पुढील ठिकाणांचा समावेश होतो.

1. कोकण :-30746 चौरस किलोमीटर:
कोकण भागात मुंबई,मुंबई उपनगर,ठाणे, पालघर,रायगड, रत्नागिरी/सिंधुदुर्ग इत्यादींचा समावेश होतो.

2. पुणे/पश्चिम महाराष्ट -57268 चौरस किलोमीटर:
पुणे पश्चिम महाराष्ट विभागात पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर इत्यादी ठिकाणांचा समावेश होतो.

3. नाशिक/खान्देश -574426 चौ.किमी:
खान्देश विभागात नाशिक,अहमदनगर,धुळे,जळगाव, नंदुरबार इत्यादी ठिकाणांचा समावेश होतो.

4. औरंगाबाद/मराठवाडा -64822 चौ.किमी:
औरंगाबाद तसेच मराठवाडा विभागात औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, हिंगोली,उस्मानाबाद,लातूर, नांदेड इत्यादी ठिकाणांचा समावेश होतो.

5. अमरावती/पश्चिम विदर्भ -46090 चौ.किमी:
पश्चिम विदर्भ भागात अमरावती, बुलढाणा, अकोला, यवतमाळ,वाशिम इत्यादी ठिकाणांचा समावेश होतो.

6. नागपूर/पूर्व विदर्भ -51336 चौ.किमी:
पुर्व विदर्भ भागात नागपूर, वर्धा, चंद्रपूर,गडचिरोली, भंडारा, गोंदिया इत्यादी ठिकाणांचा समावेश होतो.

नैसर्गिक सीमांची नावे :

● ईशान्य दिशेला दरेकासा टेकड्या.
● उत्तर दिशेला : सातपुडा पर्वतरांगा व त्याच्या पुर्व दिशेला गाविलगड टेकड्या.
● दक्षिण दिशेला : हिरण्यकेशी नदी आणि कोकण मधील तेरेखोल नदी.
● पश्चिम दिशेला : अरबी समुद्र
● पूर्व दिशेला : चिरोळी टेकड्या व भामरागड डोंगर
● वायव्य दिशेला : सातमाळा डोंगररांगा,गाळणा टेकड्या व सातपुडा पर्वतातील अक्राणी टेकड्या.

 

भारताच्या राजकीय सीमा व सरहद्द :

● वायव्य दिशेला : गुजरात आणि दादरा नगर हवेली.
● उत्तर दिशेला : मध्यप्रदेश
● पूर्व दिशेला : छत्तीसगड
● आग्नेय दिशेला : आंध्र प्रदेश
● दक्षिण दिशेला : कर्नाटक आणि गोवा.

महाराष्ट्रातील पर्वत शिखरे

शिखराचे नाव उंची-height -मीटर जिल्हे -district

शिखराचे नाव उंची-height -मीटर जिल्हे -district

1 कळसूबाई -1646 नगर -महाराष्ट्र तील सर्वात उंच शिखर
2 चिखलदरा- 1115- अमरावती
3 तोरणा -1404 -पुणे
4 त्र्यंबकेश्वर -1304 -नाशिक
5 नाणेघाट -1264 -पुणे
6 बैराट -1177- अमरावती
7 महाबळेश्वर -1438- सातारा
8 राजगड -1376-पुणे
9 रायेश्वर -337- पुणे
10 शिंगी -1293- रायगड
11 सप्तशृंगी -1416 -नाशिक
12 साल्हेर -1567- नाशिक
13 हरिश्चंद्रगड 1424 -अहमद नगर

See also  घरातील लाईट बील निम्म्यापेक्षा कमी येण्यासाठी घरात वापरा हे उपकरण  - What is NFC and how does it work?

महाराष्ट्रातील विदयापीठे आणि त्यांची स्थापना :

महाराष्ट्रातील विदयापीठे आणि त्यांची स्थापना :
महाराष्ट्रातील विदयापीठे आणि त्यांची स्थापना :

● मुंबई विद्यापीठाची स्थापणा 1857 मध्ये मुंबई येथे झाली होती.
● राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपुर विद्यापीठाची स्थापणा नागपुर येथे 1923 रोजी करण्यात आली होती.
● पुणे विद्यापीठाची स्थापणा 1948 मध्ये पुणे येथे करण्यात आली होती.
● एस.एन.डी.टी महिला विद्यापीठाची स्थापणा 1951 मध्ये मुंबई येथे करण्यात आली होती.
● डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची स्थापणा 1958 मध्ये औरंगाबाद येथे करण्यात आली होती.
● कवि कुलगुरू कालिदास विद्यापीठाची स्थापणा 1998 रामटेक नागपुर येथे करण्यात आली होती.
● शिवाजी विद्यापीठाची स्थापणा 1963 मध्ये कोल्हापूर येथे करण्यात आली होती.
● संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाची स्थापणा 1983 मध्ये अमरावती येथे करण्यात आली होती.
● यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाची स्थापणा 1988 मध्ये नाशिक येथे करण्यात आली होती.
● कवयित्री बहिणाबाई चौधरी नॉर्थ महाराष्ट्र विदयापीठाची स्थापणा 1990 जळगाव येथे करण्यात आली होती.
● डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठाची स्थापणा 1989 मध्ये लोनेर येथे करण्यात आली होती.
● स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाची स्थापणा 1994 मध्ये नांदेड येथे करण्यात आली होती.
● पशू व मत्सविज्ञान विद्यापीठाची स्थापणा 2000 सालामध्ये नागपुर येथे करण्यात आली होती.
● गोंडवाना विद्यापीठाची स्थापणा 2010 मध्ये गडचिरोली येथे करण्यात आली होती.
● सोलापूर विद्यापीठाची स्थापणा 2004 मध्ये सोलापूर येथे करण्यात आली होती.

● महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाची स्थापणा 1998 मध्ये नाशिक येथे करण्यात आली होती.
● महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाची स्थापणा 1997 वर्धा येथे करण्यात आली होती.

महाराष्ट्रातील महत्वाचे घाट आणि रस्त्यांची नावे-

1 अंबोली घाट – कोल्हापुर ते सावंतवाडी मार्ग
2 आंबा घाट – कोल्हापूर ते रत्नागिरी मार्ग
3 उत्तर तिवरा घाट – सातारा ते रत्नागिरी मार्ग
4 कन्नड घाट – औरंगाबाद मार्ग
5 करुळ घाट -कोल्हापूर ते विजयदुर्ग मार्ग -जि. सिंधुदुर्ग
6 कसारा घाट – नाशिक ते मुंबई महामार्ग
7 कात्रज घाट – पुणे ते सातारा मार्ग
8 कुंभार्ली घाट – सातारा ते रत्नागिरी कराड ते चिपळूण मार्ग
9 कुसुर घाट – पुणे ते पनवेल मार्ग

 

महाराष्ट्रातील महत्वाचे घाट आणि रस्त्यांची नावे-
महाराष्ट्रातील महत्वाचे घाट आणि रस्त्यांची नावे-

10 केंळघरचा घाट – सातारा ते रत्नागिरी मार्ग
11 खंडाळा घाट – पुणे ते पनवेल मार्ग
12 खंडाळा घाट – पुणे ते मुंबई मार्ग
13 खंबाटकी घाट – पुणे ते सातारा मार्ग
14 चंदनपुरी घाट – पुणे ते संगमनेर मार्ग
15 ताम्हणी घाट – रोहा -रायगड ते पुणे
16 थळघाट – नाशिक ते मुंबई महामार्ग
17 दिवा घाट – पुणे ते बारामती मार्ग
18 नाणे घाट – जुन्नर ते कल्याण अहमदनगर ते मुंबई मार्ग
19 पसरणी घाट – वाई -रायगड पुणे ते सातारा वाई
20 पांचगणी घाट – पोलादपुर ते वाई मार्ग
21 पार घाट – सातारा ते रत्नागिरी मार्ग
22 पालघाट – यावल ते इंदोर मार्ग
23 फिटस् जिराल्डाचा घाट – महाबळेश्वर ते अलिबाग मार्ग
24 फोंडा घाट – कोल्हापूर ते पणजी संगमेश्वर ते कोल्हापुर मार्ग
25 बावडा घाट – कोल्हापुर ते खारेपाटण मार्ग
26 बोरघाट – पुणे ते कुलाबा मार्ग
27 भीमाशंकर घाट – पुणे ते महाड मार्ग
28 माळशेज घाट – अहमदनगर ते कल्याण -मुंबई ठाणे ते पुणे मार्ग
29 राम घाट – कोल्हापुर ते सावंतवाडी मार्ग
30 रूपत्या घाट – पुणे ते महाड मार्ग
31 वरंधा घाट – पुणे – महाड – भोर – महाड
32 विटाघाट – संगमनेर ते शहापूर मार्ग
33 सारसा घाट – सिरोंचा ते चंद्रपुर मार्ग
34 हनुमंते घाट – कोल्हापुर ते कुडाळ मार्ग
35 हातलोट घाट – सातारा ते रत्नागिरी

महाराष्टातील साक्षरतेचे प्रमाण :

● महाराष्ट्राची साक्षरता 2011 मध्ये 82. 34% होती.
● पुरुष वर्गाची साक्षरता – 88.38% इतकी आहे.
● स्त्री साक्षरतेचे प्रमाण – 75.90% आहे.
● ग्रामीण साक्षरतेचे प्रमाण – 77.01 % आहे.
● नागरी साक्षरतेचे प्रमाण- 88.89 % आहे.
● मुंबई उपनगर महाराष्ट्रातील सर्वाधिक साक्षर जिल्हा आहे.
● पालघर हा महाराष्ट्रातील सर्वात कमी साक्षर जिल्हा आहे.
1. सिंधुदुर्ग हा महाराष्ट्रातील पहिला संपूर्ण साक्षर जिल्हा आहे.
● महाराष्ट्रातील लोकसंख्येची घनता 365 इतकी आहे.
● लोकसंख्येच्या घनतेनुसार महाराष्ट्राचा फक्त राज्यामध्ये अकरावा नंबर लागतो तर राज्य व केंद्रशासित प्रदेश या दोघांच्या तुलनेत सतरावा क्रमांक लागतो.
● मुंबई उपनगर महाराष्ट्रातील सर्वाधिक घनता असलेला जिल्हा आहे.-20,980
● गडचिरोली हा सर्वात कमी लोकसंख्या घनतेचा जिल्हा आहे.-74
● महाराष्ट्रातील स्त्री आणि पुरुष यांचे प्रमाण एकुण 929 इतके आहे.
● स्त्री-पुरुष प्रमाणाच्या बाबतीत महाराष्ट्राचा देशात 22वा क्रमांक लागतो.
● रत्नागिरी हा जिल्हा महाराष्ट्रात स्त्री-पुरुष प्रमाण सर्वाधिक असणारा जिल्हा आहे. -1122
● महाराष्ट्रात स्त्री-पुरुष प्रमाण सर्वात कमी असणारा जिल्हा मुंबई शहर आहे. -832
● महाराष्ट्रात 0ते 6 सहा वयोगटातील स्त्री-पुरुषांचे प्रमाण 894 इतके आहे.
● महाराष्ट्रात ०ते सहा वयोगटातील स्त्री-पुरुष प्रमाण सर्वाधिक असणारा जिल्हा पालघर हा आहे.-967
● महाराष्ट्रात 0 ते 6 वयोगटातील स्त्री-पुरुष प्रमाण सर्वात कमी असणारा जिल्हा बीड हा आहे.-807

महाराष्ट्रातील कोणते राज्य,कोणता जिल्हा कशासाठी प्रसिद्ध आहेत ?

1 अमरावती–देवी रुक्मिणी आणि दमयंतीचा जिल्हा म्हणून प्रसिदध आहे.
2 अहमदनगर-साखर कारखान्यांचा जिल्हा म्हणून प्रसिदध आहे.
3 उस्मानाबाद–श्री भवानी मातेचा जिल्हा म्हणून प्रसिदध आहे.
4 औरंगाबाद–वेरुळ,अजिंठा लेण्यांचा जिल्हा म्हणुन प्रसिदध तसेच मराठवाडयाची राजधानी म्हणुन प्रचलित.
5 कोल्हापुर-कुस्तीगिरांचा तसेच गुळाचा जिल्हा
6 गडचिरोली–जंगलांचा जिल्हा म्हणुन प्रसिदध आहे.
7 चंद्रपुर-गौंड राजांचा जिल्हा म्हणुन प्रसिदध आहे
8 जळगाव-येथे कापसाचे शेत आहे केळीच्या बागा आहेत आणि हे अजिंठा लेण्यांचे प्रवेशद्वार म्हणून देखील प्रसिदध आहे.
9 धुळे-सोलर सिटीचा जिल्हा म्हणुन प्रसिदध आहे.
10 नंदुरबार-आदिवासी जिल्हा म्हणुन प्रसिदध आहे.
11 नांदेड-संस्कृत कवींचा जिल्हा म्हणुन प्रसिदध आहे.
12 नागपुर-संत्र्यांचा जिल्हा म्हणुन प्रसिदध आहे
13 नाशिक-मुंबईची परसबाग म्हटले जाते,द्राक्षांचा जिल्हा म्हणुन देखील ओळखले जाते.मुंबईचा गवळीवाडा म्हणून देखील प्रचलित आहे.
14 परभणी-ज्वारीचे कोठार म्हणुन प्रसिदध आहे.
15 बीड-जुन्या मराठी कवींचा जिल्हा म्हणुन प्रसिदध मिठागरांचा जिल्हा,वळादेवळा जिल्हा,ऊस कामगारांचा जिल्हा म्हणुन प्रसिदध आहे.
16 बुलढाणा-महाराष्ट्रातील कापसाची बाजारपेठ म्हणुन प्रसिदध आहे.
17 भंडारा-तलावांचा जिल्हा म्हणुन प्रसिदध आहे.
18 मुंबई हे भारताचे प्रवेशद्वार आहे.भारताचे प्रथम क्रमांकाचे औद्योगिक शहर आहे.मुंबई ही भारताची राजधानी म्हणुन देखील प्रसिदध आहे.
19 यवतमाळ-पांढरे सोने तसेच कापसाचा जिल्हा म्हणुन प्रसिदध आहे.
20 रत्नागिरी हा देशभक्त व समाजसेवकांचा जिल्हा म्हणुन प्रसिदध आहे.
21 रायगड-तांदळाचे कोठार आणि डोंगरी किल्ले असलेला जिल्हा म्हणुन प्रसिदध आहे.
22 सांगली – हळदीचा तसेच कलावंतांचा जिल्हा म्हणुन प्रसिदध आहे.
23 सातारा-कुंतल देश म्हणुन तसेच शुर वीरांचा जिल्हा म्हणुन प्रसिदध आहे.
24 सोलापूर-ज्वारीचे कोठार म्हणुन प्रसिदध आहे येथील सोलापुरी चादरी देखील प्रसिदध आहेत.

See also  न्युट्रीशिअन अणि डायटेशिअन मधील फरक -Difference between nutrition and dietitian in Marathi

महाराष्ट्रातील १५ कर्तृत्ववान महिलांची नावे –

1 अरुणा राजे पाटील- भारतीय चित्रपटसृष्टीतील पहिली तंत्रज्ञ म्हणुन प्रसिदध आहे.
2 आ.डाँ भारती लव्हेकर- यांनी आपल्या भारत देशात पहिली सॅनिटरी नॅपकिन बँक सुरू केली होती.
3 उपासना मकाती- अंधांसाठी देशातील पहिले जीवन शैलीविषयी मासिक ब्रेल लिपीमध्ये यांनी प्रकाशित केले होते.
4 डायना एदलजी-भारतीय महिला क्रिकेट एकदिवसीय संघाची पहिली कर्णधार.
5 डॉ. इंदिरा हिंदुजा-देशातील प्रथम टेस्ट टय़ूब बेबीची प्रसूती करणारी स्त्रीरोग तज्ज्ञ म्हणुन प्रसिदध आहे.
6 डॉ.अबन मिस्त्री- भारत देशातील पहिल्या महिला तबला वादक म्हणून प्रसिदध आहेत.

महाराष्ट्रातील १५ कर्तृत्ववान महिलांची नावे -
महाराष्ट्रातील १५ कर्तृत्ववान महिलांची नावे –

7 दुर्गाबाई कामत- भारतीय चित्रपट सृष्टीतील पहिली अभिनेत्री म्हणुन प्रसिदध आहे.याचसोबत दुर्गाबाई कामत यांनी दादासाहेब फाळके यांच्या ‘मोहिनी भस्मासूर’ -१९१३ या चित्रपटात पार्वतीचे भुमिका पार पाडली होती.दुर्गाबाई कामंत याची कन्या कमलाबाई कामंत -विवाहोत्तर- कमलाबाई गोखले यांनी या चित्रपटात नायिकेची भूमिका पार पाडली होती.
8 भाग्यश्री ठिपसे- पाच वेळा भारतीय महिला बुद्धिबळ स्पर्धेत विजय प्राप्त करणारी विजेता.
9 रजनी पंडित-देशातील पहिली नोंदणीकृत महिला खासगी गुप्तहेर म्हणुन प्रसिदध आहे
10 शिला डावरे- पहिल्या महिला ऑटोरिक्षा चालक म्हणुन ओळखल्या जातात.
11 सुरेखा यादव- पहिल्या महिला रेल्वे चालक म्हणुन ओळखल्या जातात.
12 स्नेहा कामत-यांनी देशातील प्रथम वाहन चालक प्रशिक्षण संस्था स्थापन केली होती.
13 स्वाती पिरामल-असोसिएटेड चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रिज ऑफ इंडियाची पहिल्या महिला अध्यक्ष होत्या.
● हर्षिणी कण्हेकर – पहिली महिला अग्निशामक अधिकारी होत्या.
● ता आनंद- डिजिटल आर्टच्या माध्यमातुन भारतातील महिला योदधांचा आपणास परिचय घडवून दिला होता.

महाराष्ट्रातील काही प्रमुख कृषि संशोधन संस्थांची नावे पुढीलप्रमाणे आहेत-

1. काजू संशोधन केंद्र,वेंगुर्ला -सिंधुदुर्ग
2. केळी संशोधन केंद्र यावल -जळगाव
3. गवत संशोधन केंद्र -पालघर -ठाणे
4. नारळ संशोधन केंद्र भाटय़े -रत्नागिरी.महाराष्ट्रातील प्रमुख कृषि संशोधन संस्थांची
5. मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र पाडेगांव -सातारा
6. राष्ट्रीय कांदा- लसून संशोधन केंद्र राजगुरूनगर -पुणे
7. राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र हिरज -केगांव -सोलापूर.
8. सुपारी संशोधन केंद्र-श्रीवर्धन -रायगड
9. हळद संशोधन केंद्र -डिग्रज सांगली

कृषि पर्यटन व्यवसाय माहिती – Agriculture tourism business information in Marathi

 

महाराष्ट्रातील थंड हवेच्या ठिकाणांची नावे पुढीलप्रमाणे आहेत –

1. आंबोली -सिंधुदुर्ग
2. खंडाळा -पुणे
3. चिखलदरा-गाविलगड -अमरावती
4. जव्हार -ठाणे
5. तोरणमाळ -नंदुरबार
6. पन्हाळा -कोल्हापूर
7. पाचगणी -सातारा
8. भिमाशंकर -पुणे

महाराष्ट्रातील थंड हवेच्या ठिकाणांची नावे पुढीलप्रमाणे आहेत -

9. महाबळेश्वर -सातारा
10. माथेरान -रायगड
11. मोखाडा -ठाणे
12. म्हैसमाळ -औरंगाबाद
13. येडशी -उस्मानाबाद
14. रामटेक -नागपूर
15. लोणावळा -पुणे
16. सूर्यामाळ -ठाणे

महाराष्ट्रातील नद्यांचा संगम व तेथील महत्त्वाच्या स्थळांची नावे

पुढीलप्रमाणे आहेत-

1. कृष्णा व कोयना – कराड -सातारा
2. कृष्णा व पंचगंगा – नरसोबाची वाडी -सांगली
3. कृष्णा व येरळ – ब्रम्हनाळ -सांगली
4. कृष्णा व वेष्णा -माहुली-सातारा
5. गोदावरी व प्रवरा – टोके, -अहमदनगर


6. गोदावरी व प्राणहिता -सिंरोंचा -गडचिरोली
7. तापी व पांजरा – मूडावद,-धुळे
8. तापी व पूर्णा – श्रीक्षेत्र चांगदेव
9. तिर्थक्षेत्र, -जळगाव
10. प्रवरा नदी व मुळा नेवासे-अहमदनगर
11. मुळा व मुठा – पुणे

महाराष्ट्रातील काही महामंडळांची नावे आणि त्यांच्या स्थापणेचा कालावधी

पुढीलप्रमाणे आहे –

  • ● महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची स्थापणा – दिनांक १ ऑगस्ट, १९६२ रोजी करण्यात आली होती.
    ● महाराष्ट्र राज्य औद्योगिक व गुंतवणूक महामंडळाची स्थापणा ३१ मार्च १९६६ स्थापणा रोजी करण्यात आली होती.
    ● महाराष्ट्र राज्य वित्तीय महामंडळाची स्थापणा – दिनांक १ एप्रिल, १९६२ रोजी करण्यात आली होती.
    ● महाराष्ट्र राज्य लघु उद्योग विकास महामंडळाची स्थापणा १९६२ मध्ये करण्यात आली होती.
    ● महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशनची स्थापणा १९७८ मध्ये करण्यात आली होती.
    ● महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळाची स्थापणा १९६२ रोजी करण्यात आली होती.
    ● महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची स्थापणा १९७५ मध्ये करण्यात आली होती.
    ● महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची स्थापणा १९६१ मध्ये करण्यात आली होती.
    ● महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाची स्थापणा -मर्यादित १९६३ मध्ये करण्यात आली होती.
    ● महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाची स्थापणा १९६५ मध्ये करण्यात आली होती.
    ● मराठवाडा विकास महामंडळाची स्थापणा – १९६७ रोजी करण्यात आली होती.
    ● कोकण विकास महामंडळाची स्थापणा -मर्यादित १९७० मध्ये करण्यात आली होती.
    ● विदर्भ विकास महामंडळाची स्थापणा -मर्यादित १९७० मध्ये करण्यात आली होती.
    ● महाराष्ट्र कृष्ण खोरे महामंडळाची स्थापणा – १९९६ मध्ये करण्यात आली होती.
    ● विदर्भ सिंचन विकास महामंडळाची स्थापणा १९९७ मध्ये करण्यात आली होती.
  • ● कोकण सिंचन विकास महामंडळाची स्थापणा १९९७ मध्ये करण्यात आली होती.
    ● तापीसिंचन विकास महामंडळाची स्थापणा १९९७ मध्ये करण्यात आली होती.
    ● गोदावरी मराठवाडा सिंचन विकास महामंडळाची स्थापणा १९९८ मध्ये करण्यात आली होती.
    ● महात्मा फुले मागास वर्ग विकास महामंडळाची स्थापणा १९७८ मध्ये करण्यात आली होती.
    ● म्हाडा ची स्थापणा १९७६ मध्ये करण्यात आली होती.
See also  कँश फ्लो स्टेटमेंट विषयी माहीती Cash flow statement information in Marathi

महाराष्ट्राच्या दख्खनवरील पठारांची नावे-

● अहमदनगर पठार -अहमदनगर
● औंध पठार -सातारा
● खानापूर पठार -सांगली
● तोरणमाळ पठार -नंदुरबार
● पाचगणी पठार -टेबललँड सातारा
● बुलढाणा पठार -बुलढाणा
● मालेगांव पठार -नाशिक
● सासवड पठार -पुणे

दख्खनच्या पठारावरच्या अन्य डोंगर तसेच टेकड्यांची नावे-● अजिंठा डोंगर -औरंगाबाद
● अस्तंभा डोंगर -नंदुरबार
● गरमसूर डोंगर -नागपुर

दख्खनच्या पठारावरच्या अन्य डोंगर तसेच टेकड्यांची नावे-

● गाळणा डोंगर-धुळे नंदुरबार

 

● चिरोली डोंगर -गडचिरोली
● दरकेसा टेकड्या -गोंदिया
● भामरागड -गडचिरोली
● मुदखेड डोंगर -नांदेड
● वेरुळ डोंगर -औरंगाबाद
● सुरजागड -गडचिरोली
● हिंगोली डोंगर -हिंगोली

महाराष्ट्रातील पंचायतराज विषयी महत्वाची माहीती –

● आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार वसंतराव नाईक यांच्या कठोर परिश्रमपुर्वक लोककल्याणकारी व पारदर्शक विचारकृतीमधुन जन्मास आलेले पंचायत राज सध्या संपूर्ण राज्यात चर्चेस आहे.

● स्थानिक स्वराज्य संस्थांना संस्थांना ‘लोकशाहीचा पाळणा’ म्हणून ओळखतात.

● राष्ट्रीय विस्तार कार्यक्रमाची -National Extension Program सुरुवात 2 ऑक्टोबर 1953 रोजी झाली होती.

● बलवंतराय मेहता समितीची केंद्र शासनाने नेमणूक 16 जानेवारी 1957 रोजी केली होती.

● बलवंतराय मेहता समितीच्या शिफारशीवर विचार करून त्यावर अहवाल सादर करण्यासाठी राज्य सरकारने वसंतराव नाईक समितीची नियुक्ती केली होती.
● वसंतराव नाईक समिती 27 जून 1960 रोजी नेमली गेली होती.
● वसंतराव नाईक त्याकाळी महसुलमंत्री ह्या पदावर कार्यरत होते.
● वसंतराव नाईक समितीने एकूण २२६ शिफारसी केल्या होत्या.
● वसंतराव नाईक समितीने जिल्हा परिषद स्तराला सर्वाधिक महत्त्व देण्याची शिफारस केली होती. त्याचा परिपाक म्हणून महाराष्ट्रातील पंचायतराज व्यवस्था वेगळ्या धाटणीची ठरली.
● पंचायत राज व्यवस्थेत एकूण तीन स्तर आहेत.-ग्रामपंचायत-पंचायत समिती-जिल्हा परिषद
● महाराष्ट्रात पंचायत राजव्यवस्थेचा प्रारंभ 1 मे 1962 रोजी झाला होता.
● ‘महसुली खेड्या’ची व्याख्या महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम,1966 कायद्यान्वये करण्यात आली आहे.
● महाराष्ट्रात ग्रामपंचायतींची सदस्य संख्या 7 ते 17 इतकी असते.
● ग्रामपंचायतींची सदस्य संख्या किती असावी हे राज्यशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी ठरवत असतो.
● ग्रामपंचायतींचे आरक्षण ठरविण्याचा अधिकार जिल्हाधिकारीला असतो.
● ग्रामपंचायतीचा कार्यकाळ पाच वर्षाचा असतो.
● ग्रामपंचायतीचा कार्यकाळ पहिल्या सभेपासून मोजला जातो.
● ग्रामपंचायतीच्या पहिल्या बैठकीचे अध्यक्ष/पीठासन अधिकारी तहसिलदार असतो.
● सरपंच/उपसरपंच यांच्या निवडणूकीबाबतच्या वादावर अंतिम निर्णय विभागीय आयुक्त घेत असतात.
● उपसरपंच आणि इतर ग्रामपंचायत सदस्य आपला राजीनामा सरपंचाकडे देत असतात.
● सरपंच आपला राजीनामा पंचायत समिती सभापती कडे देत असतो.
● पुरुष सरपंच/उप-सरपंच यांच्यावरील अविश्वास ठराव पारित होण्यासाठी दोन तृतीयांशा बहुमताची आवश्यकता असते.
● महिला सरपंच/उप-सरपंच यांच्यावरील अविश्वास ठराव पारित होण्यासाठी तीन चतुर्थांश बहुमतांची आवश्यकता असते.
● पंचायत समिती उप-सभापती आणि इतर पंचायत समिती सदस्य आपला राजीनामा
पंचायत समिती सभापतीकडे देत असतात.
● पंचायत समिती सभापती आपला राजीनामा जिल्हा परिषद अध्यक्ष कडे देत असतात
● जिल्हा परिषद सदस्य आपला राजीनामा संबंधित विषय समिती सभापती कडे देत असतात.
● जिल्हा परिषद उपाध्यक्ष आणि विषय समितींचे सभापती आपला राजीनामा जिल्हा परिषद अध्यक्षाकडे देत असतात
● जिल्हा परिषद अध्यक्ष आपला राजीनामा विभागीय आयुक्तकडे देत असतात.
● ग्रामसेवक हा ग्रामपंचायतीचा सचिव असतो मात्र ग्रामपंचायतीचा नोकर नसतो.

● ग्रामसेवक जिल्हा परिषदेचा नोकर असतो.
● ग्रामसेवकाचे वेतन जिल्हा परिषदेच्या जिल्हानिधी तून दिले जात असते.
● ग्रामीण भागात ‘बालविवाह प्रतिबंधक अधिकारी’ म्हणून ग्रामसेवक कार्य पाहत असतो.
● ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्र पुढील ठिकाणी आहेत -शिंदेवाही -चंद्रपूर आणि मांजरी -पुणे
● ग्रामपंचायतीचे कर निश्चित करण्याचा अधिकार राज्यशासनाकडे असतो.
● सरपंच समितीचा पदसिध्द सचिव म्हणून विस्तार अधिकारी काम पाहत असतो.
● गटविकास अधिकारी ग्रामविकास खात्याचा अधिकारी असतो.
● जिल्हा नियोजन मंडळाचे अध्यक्ष जिल्ह्याचे पालकमंत्री असतात.
● जिल्हा नियोजन मंडळाचे सचिव जिल्हाधिकारी असतो.
● जिल्हा परिषदेच्या एकूण दहा समित्या असतात. -स्थायी+9 विषय समित्या
● जिल्हा परिषदेच्या समित्या पुढीलप्रमाणे आहेत –
स्थायी, कृषी,समाजकल्याण, शिक्षण, बांधकाम, वित्त, आरोग्य, पशुसंवर्धन व दुग्धविकास, महिला व बालकल्याण, जलसंधारण व पेयजल पुरवठा

● जिल्हा परिषदेच्या स्थायी समितेचे पदसिध्द अध्यक्ष जिल्हा परिषद अध्यक्ष हेच असतात.
● महाराष्ट्र पंचायत राजचे जनक वसंतराव नाईक आहेत.

महाराष्ट्रातील महत्वाच्या प्रकल्पाची नावे पुढीलप्रमाणे आहेत-

महाराष्ट्रातील जलविद्युत प्रकल्पांची नावे :

● कोयना प्रकल्प -सातारा
● खोपोली जलविद्युत प्रकल्प -रायगड
● जायकवाडी प्रकल्प -औरंगाबाद
● तिल्लारी प्रकल्प- -कोल्हापूर
● पेंच प्रकल्प -नागपूर
● भिरा अवजल प्रवाह प्रकल्प – रायगड

महाराष्ट्रातील अणुविदयुत प्रकल्पांची नावे पुढीलप्रमाणे आहेत-

● उमरेड प्रकल्प-नागपूर -नियोजित
● जैतापुर प्रकल्प -रत्नागिरी
● तारापुर प्रकल्प -ठाणे

महाराष्ट्रातील पवन विद्युत प्रकल्पांची नावे पुढीलप्रमाणे आहेत-

● चाळकेवाडी -सातारा
● जमसांडे -सिंधुदुर्ग
● ठोसेघर -सातारा
● ब्रह्मनवेल -धुळे
● वनकुसवडे -सातारा
● शाहजापूर -अहमदनगर

महाराष्ट्रातील जलाशय व धरणांची नावे पुढीलप्रमाणे आहेत-

● उज्जनी – -भीमा सोलापूर
● कोयना – शिवाजी सागर – -कोयना
● हेळवाक -सातारा
● खडकवासला – -मुठा पुणे
● गंगापूर धरण- -गोदावरी जि.नाशिक
● जायकवाडी धरण- नाथसागर -गोदावरी औरंगाबाद
● तोतलाडोह – मेघदूत जलाशय -पेंच- नागपूर
● बाभळी प्रकल्प – -गोदावरी नांदेड
● भंडारदरा – -प्रवरा अहमदनगर
● यशवंत धरण – -बोर वर्धा
● येलदरी – -पूर्णा परभणी
● राधानगरी – -भोगावती कोल्हापूर

महाराष्ट्रातील अष्टविनायकांची नावे आणि त्यांची ठिकाणे –

1. ओझरचा विघ्नेश्वर-पुणे
2. थेऊरचा चिंतामणी -पुणे
3. पालीचा बल्लाळेश्वर -रायगड
4. महाडचा वरद विनायक -रायगड
5. मोरगावचा मोरेश्वर -पुणे
6. रांजणगांवचा महागणपती -पुणे
7. लेण्याद्रीचा गिरिजात्मक -पुणे
8. सिदधटेकचा सिध्दी विनायक-अहमदनगर

 

माहिती स्रोत- इंटरनेट, विविध MPSC स्टडी ग्रुप , सोशल चॅनेल्स

Image source – Maharashtra Tourism

3 thoughts on “महाराष्ट्र राज्याविषयी महत्वपुर्ण माहिती – Maharashtra information in Marathi”

Comments are closed.