महात्मा फुले यांचे प्रेरणादायी विचार – Mahatma Phule inspirational thoughts in Marathi
1) प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने तेच पोहु शकतात.ज्यांचे निर्धार ठाम असतात.ज्यांना कुठलेही उद्दिष्ट गाठायचे
असते.
2) देव लग्नाच्या जोड्या स्वर्गात बनवतो मग त्या सर्व जोडया एकाच जातीच्या का असतात देव जातीवादी आहे का?
3) स्वताच्या हितासाठी काही लोकांनी काल्पनिक देव निर्माण केले अणि पाखंड रचले
4) सत्कर्म केल्याने वैभव मिळणार नाही पण शांती अणि सुख मिळेल.अणि दुष्कर्म केल्याने वैभव मिळणार पण शांती सुख मिळणार नाही.
5) मनुष्य हा सर्व प्राण्यांपेक्षा श्रेष्ठ आहे अणि सर्व मानवामध्ये स्त्री श्रेष्ठ आहे.
6) महिला अणि पुरूष जन्मापासून मुक्त आहेत.म्हणुन दोघांनाही समान हक्क अणि हक्क उपभोगण्याची संधी मिळाली पाहिजे.
7) स्वार्थाला वेगवेगळे रूप मिळते हे कधी जाती तर कधी धर्माचे रूप देखील धारण करते.
8) एखादे चांगले काम करण्यासाठी वाईट उपायांचा वापर करू नये
9) स्त्रियांना एक वेगळा नियम अणि पुरूषांना वेगळा नियम लागू करणे हा एक पक्षपात आहे.
10) कोणताही धर्म ईश्वर निर्मित नाही चातुर्वर्ण्य अणि जातीभेद ही निर्मिती मानवाचीच आहे.
11) निर्मात्याने एकंदर सर्व प्राणीमात्रांना निर्माण करताना मनुष्यास स्वतंत्र प्राणी म्हणून निर्माण केले आहे.त्याला आपापसातील सर्व हक्कांचा उपभोग घेण्यास समर्थ बनवले आहे.
12) जो कोणी आपले भाऊबंद,सगेसोयरे इष्ट मित्रांना आपल्यासह श्रेष्ठ मानुन इतर कोणत्याही पुरूषास मानव प्राण्यास पिढीजातपणे किंवा कपटाने अपवित्र किंवा नीच मानत नाही सत्यवर्तनी म्हणावे.
13) साथ कोणी दिली तर जात तुम्ही पाहु नका हात कोणी दिला तर पाठ तुम्ही फिरवू नका.
14) जीवनात नुसत्या चाकांवर कधीही गाडी धावत नाही साखळीत साखळी गुंतल्याशिवाय गती प्राप्त होत नसते.
15) तोडताना एक घाव पुरेसा असतो पण जोडताना किती भाव मोजावा लागतो.
16) विचारांचा वेगळा हा पगडा आहे पण आचरणाचा सर्व हा झगडा आहे.
17) कष्टानी जगण्याची ज्यांची धमक नाही असे लोक साधु किंवा संन्यासी भिक्षुक बनुन जगतात.अणि प्रपंच खरा नाही असा भ्रम लोकांच्या बुदधीत निर्माण करतात.असे करण्यात त्यांचा आळशी धुर्तपणाच असतो.
18) ईशवराने शुद्रातिशुद्रास व इतर लोकास आपण निर्माण केलेल्या सृष्टीतील वस्तुंचा सारख्या रीतीने उपभोग घेण्याची मोकळीक दिली असून भट लोकांनी त्यांच्या नावांचे खोटे ग्रंथ बनवुन त्यामध्ये सर्वांचे हक्क रद्द करून स्वतःच अग्रगण्य होऊन बसले.
19) केस कापणे हा नावही लोकांचा धर्म नाही धंदा आहे चांबडयाची शिलाई करणे चांभाराचा धर्म नाही धंदा आहे.याचप्रमाणे पूजा पाठ करणे हा ब्राह्मणांचा धर्म नाही धंदा आहे.
20) समाज क्रांतीसाठी स्त्री शिक्षणाची आवश्यकता आहे.
21) स्त्रिया देखील मानव आहेत त्यांना देखील शिक्षणाचा हक्क आहे.