मुंबई पोलीस भरती – जनरल नॉलेज प्रश्न – Mumbai Police Bharti GK question in Marathi

मुंबई जनरल नॉलेज वरील प्रश्न mumbai police bharti gk question in Marathi

मुंबई जिल्ह्यातील मुख्य ठिकाण मुंबई हेच आहे.मुंबई हे भारताचे प्रवेशद्वार मानले जाते.

मुंबई हे शहर महाराष्ट्राची राजधानी भारताची आर्थिक राजधानी अणि पहिल्या क्रमांकावर असलेले औद्योगिक शहर म्हणून ओळखले जाते.

साष्टी बेटाच्या दक्षिण भागात मुंबई उपनगर हा जिल्हा वसलेला आहे.

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १७ हा मुंबई गोवा मार्ग म्हणून ओळखला जातो.

मुंबई येथे वनस्पती तुप देखील बनवले जाते.

महाराष्ट्र राज्यातील सर्वात मोठी टपालकचेरी देखील मुंबई येथे आहे.

मुंबई शहरालाच भारताचे पॅरिस असे देखील म्हटले जाते.

मुंबई शहराजवळ घारापुरीची लेणी आहे.

सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ फिशर्स एज्युकेशन मुंबई येथे आहे.

उर्दू रिसर्च इन्स्टिट्यूट मुंबई येथे आहे.

जमनालाल बजाज इंस्टीटयुट आॅफ मॅनेजमेंट स्टडीज मुंबई येथे आहे.

राजेंद्र प्रसाद इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिकेशन स्टडीज मुंबई येथे आहे.

व्हिक्टोरिया जयुबलरी टेक्निकल इन्स्टिट्यूट मुंबई येथे आहे.

जे जे काॅलेज आॅफ आर्किटेक्चर मुंबई येथे आहे.

महाराष्ट्र राज्यातील सर्वात उपयुक्त असे नैसर्गिक बंदर मुंबई आहे.कारण इथे दळणवळणाची साधने रस्त्याचे जाळे खुप मोठे आहे.

टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च ही संस्था मुंबई मध्ये आहे.

मुंबई शहरात गेट वे आॅफ इंडिया देखील आहे.१९११ मध्ये राजा पाचवा जाॅर्ज अणि राणी मेरी यांच्या स्वागतासाठी हे गेट वे इंडिया बांधण्यात आले होते.

मुंबई विद्यापीठाची स्थापना १८५७ मध्ये करण्यात आली होती.

बोरिवली संजय गांधी उद्यान मुंबई जिल्हयात आहे.याचे क्षेत्रफळ १०३ चौरस किलोमीटर इतके आहे.

महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाचे मुख्यालय मुंबई येथे आहे.

आरबीआय बॅकेचे मुख्यालय मुंबई येथे आहे.

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण देखील मुंबई ह्या शहरात आहे.

मुंबई मधील मोनोरेल प्रकल्पाची सुरुवात २००८ मध्ये करण्यात आली होती.

मुंबई शेअर बाजाराची स्थापणा १८७५ मध्ये करण्यात आली होती.

See also  मानवी जीवन

मुंबई शहरात एकून १२ पोलिस झोन आहेत.

मुंबईचे क्षेत्रफळ १५७ चौरस किलोमीटर इतके आहे.

२०११ मधील जनगणनेनुसार मुंबई मधील लोकसंख्या ३१,४५,९६६

मुंबईच्या उत्तरेस मुंबई उपनगर आहे.अणि दक्षिण पूर्व भागात अरबी समुद्र आहे.

मुंबई हा राज्यात आकारमानाने अणि क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान असलेला जिल्हा आहे.

बृहन्मुंबई जिल्ह्याचे विभाजन करून मुंबई शहर आणि मुंबई उपनगर ह्या दोन्ही जिल्ह्यांची निर्मिती १९९० मध्ये करण्यात आली होती.

१८७७ मध्ये मुंबई येथे शासनमान्य रोखे बाजार स्थापित करण्यात आला होता.हा भारतातील पहिला सुसंघटित रोखे बाजार म्हणून देखील ओळखला जातो.

मुंबई येथील दादर ह्या ठिकाणी महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची चैत्यभूमी देखील आहे.

जेराल्ड अलजिअर यांना मुंबई शहराचे शिल्पकार मानले जाते.

१६६८ मध्ये चाल्सने मुंबई ईस्ट इंडिया कंपनीस भाडयाने दिली होती.

१८६५ मध्ये मुंबई नगरपालिका स्थापित करण्यात आली होती.

१८५३ मध्ये मुंबई मध्य रेल्वे वाहतूक सुरू करण्यात आली होती.

भारत छोडो ही घोषणा १९४२ मध्ये गवालिया टॅक मैदान येथे देण्यात आली होती.

मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना १८६२ मध्ये करण्यात आली होती.

मुंबई हे नाव १९९६ मध्ये ठेवण्यात आले होते.

मुंबई महानगरपालिका रचना महापालिका अधिनियम १९८८ नुसार करण्यात आली आहे.

मुंबई मधील महापौर यांचा कार्यकाळ २.५ वर्ष इतका असतो.

मुंबई महानगर स्थानिक विकास प्राधिकरणाची स्थापना १९७५ मध्ये करण्यात आली होती.

मुंबई शहर पोलिस कायदा १९०२ मध्ये अस्तित्वात आला होता.

महाडाची स्थापणा १९७७ नुसार करण्यात आली होती.

मुंबई महानगर स्थानिक विकास प्राधिकरण पदाधिकारी समितीचे अध्यक्ष महाराष्ट्र राज्यातील मुख्यमंत्री असतात.

मुंबई पोलीस महाराष्ट्र पोलीस मध्ये १९५१ मध्ये समाविष्ट झाले होते.

लोकसंख्येच्या घनतेमध्ये पहिला क्रमांक लागतो अणि मुंबई उपनगर जिल्ह्याचा दुसरा क्रमांक लागतो.

मुंबई शहरात सागरकिनारा आहे त्या सागर किनारयाच्या सभोवताली माहीमची खाडी आहे येथे मत्स्यव्यवसाय महत्वाचा ठरतो.

See also  दरवर्षी २३ मार्च रोजी शहीद दिवस का साजरा केला जातो?याचे महत्त्व तसेच इतिहास काय आहे? -Shahid Divas

महाराष्ट्र राज्यातील सर्वाधिक लोकसंख्येची घनता असलेला जिल्हा मुंबई शहर आहे.

मुंबई येथील महालक्ष्मी भागात घोड्यांच्या शर्यतीचे मैदान आहे.

महाराष्ट्र राज्यातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान जिल्हा मुंबई शहर आहे.

महाराष्ट्र राज्यातील आधुनिक कत्तलखाना देवनार मुंबई येथे आहे.

मुंबई शहरातील दादर व नायगाव पासुन महालक्ष्मी अणि भायखळा पर्यंतच्या भागास गिरणगाव मुंबई असे म्हटले जाते.

मुंबई मध्ये हॅगिग गार्डन आहे.ज्याचे आताचे नाव फिरोजशहा मेहता पार्क असे आहे.

वैतरणा,तानसा भातसा हे तलाव मुंबई जिल्ह्याला पाणीपुरवठा करतात.

मुंबई गोवा महामार्गावर वसई हे शहर आहे.

पावसाळ्यात कोकणातील बंदरे ही बंद असतात.

महाराष्ट्र राज्यात इंजिनिअरींग सर्च इंस्टीटयुट मुंबई येथे आहे.

भारतीय विदया भवन मुंबई येथे आहे.

भाभा आॅटोमॅटिक रिसर्च सेंटर मुंबई येथे आहे.मुंबई येथेच आॅटोमॅटिक एनर्जी देखील आहे.

शासकीय खार प्रशिक्षण प्रयोगशाळा मुंबई मधील वडाळा मध्ये आहे

आय एन एस राजेंद्र सैनिकी प्रशिक्षण देणारी संस्था मुंबई येथे आहे.

काॅटन टेक्नॉलॉजीकल रिसर्च लायब्ररी मुंबई येथे आहे.

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ बॅकर्स मुंबई येथे आहे.

बाॅम्बे नॅचरल हिस्ट्री मुंबई येथे आहे.

नरोतन मोरारजी इंस्टीटयुट आॅफ शिपिंग मुंबई येथे आहे.

हाफकिन इन्स्टिट्यूट मुंबई येथे आहे.

नेव्हल केमिकल अँड मेटरोलाॅजिकल लॅबोरेटरी मुंबई येथे आहे.

जनशक्ती हे वृतपत्र मुंबई येथे प्रसिद्ध केले जाते.

मुंबई हुन प्रसिद्ध होणारे गुजराती वृतपत्र मुंबई समाचार आहे.

इन्स्टिट्यूट ऑफ नेव्हल मेडिसिन आय एन एस मुंबई येथे आहे.

मासे डबाबंद करण्याचा उद्योग रत्नागिरी मालवण अणि मुंबई येथे चालतो.

मुंबई मध्ये काॅग्रेसचे शतक महोत्सवी अधिवेशन देखील भरले होते.

मुंबई मधील सर्वाधिक प्रसिद्ध गणेशोत्सव लालबागचा राजा आहे.

मुंबई शहराला ११४ किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे.

भारत देशातील पहिले प्राणी संग्रहालय जिजामाता उद्यान राणीची बाग आहे.

म्हातारीचा बूट ही वास्तू मुंबई मधील कमला नेहरू पार्क ह्या ठिकाणची आहे.

See also  ट्रीपल आर चा फुल फाँर्म काय होतो?- RRR movie full form in Marathi

मुंबईचा सिंह म्हणुन फिरोजशहा मेहता यांना ओळखले जाते.

मुंबई हे शहर मुंबई लहान अणि मोठा कुलाबा, माझगाव वरळी,माहीम परळ ह्या सात बेटांनी मिळुन बनलेले आहे

३१ मार्च १८६७ मध्ये आत्माराम पांडुरंग तरखडकर यांनी मुंबई येथे प्रार्थना समाजाची स्थापना केली होती.

१ नोव्हेंबर १९५६ रोजी द्विभाषिक मुंबई राज्याची स्थापना झाली होती.दविभाषिक राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण आहेत.

सन १९५४ मध्ये नानाभाई कावसजी दावर यांनी पहिली कापड गिरणी सुरू केली होती.

डी वाय पाटील क्रिकेट स्टेडियम नवी मुंबई येथे आहे.

माझगाव डॉक येथे जहाजबांधणी अणि दुरुस्ती उद्योग चालतात.

१९९६ मध्ये व्हिक्टोरिया टर्मिनलचे नाव शिवाजी महाराज टर्मिनस करण्यात आले होते.

मुंबईतील बेस्ट सेवेने महिलांसाठी सुरू केलेल्या सेवेचे नाव तेजस्विनी आहे.

१६ एप्रिल १८५३ रोजी मुंबई ते ठाणे पहिली रेल्वे सुरू करण्यात आली होती.