नाचणी पिकाचे खाण्याचे फायदे :नाचणी च आहरातील फायदे (Nachani information in Marathi)

Nachani information in Marathi)

नाचणी च आहरातील फायदे Nachani information in Marathi

नाचणी ला  नागली, रागी इ. नावाने ओळखले जाते. नागलीचे शास्त्रीय नाव इलुसाईन कोराकाना असून भारतात तसेच आफ्रिका, मलेशिया चीन व जपान या देशांमध्ये नागलीचे पीक घेतले जाते.

 डोंगरदऱयात राहणाऱ्या आदिवासी भागामध्ये मोठ्या प्रमाणात नाचणी पिकविल्या जाते व आदिवासी लोकांचे मुख्य अन्न म्हणून ही नाचणी ओळखली जाते. नाचणी ही चवीला मधुर तुरट व कडवट असते. आरोग्याच्या दृष्टीने नाचणी खूप उपयुक्त आहे.

नाचणी ही आजारातून उठणाऱ्या व्यक्‍तीकरिता पचावयास हलके म्हणून उत्कृष्ट अन्न आहे. नाचणी खाऊन अपचन, अजीर्ण, पोटात वायू धरणे, पोटदुखी, आमांश या तक्रारी केव्हाही होत नाही. त्याचबरोबर नाचणीच्या नियमित वापराने वजनही वाढत नाही.

नाचणी पोटाला त्रास न देता पिष्टमय पदार्थ शरीराला पुरविते. नाचणी पित्तशामक, थंड, रक्‍तातील उष्ण हे दोष कमी करते. स्थूल व्यक्‍तींनी वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी नाचणीचा आहारात समावेश करावा.

नाचणीमध्ये असणाऱ्या पोषक घटकामुळे नाचणीला आज खूप महत्त्व प्राप्त झाले आहे. नाचणीमध्ये कॅल्शियम, लोह, प्रथिने व खनिजे इतर धान्याच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात आहे. खाली दिलेल्या पोषकद्रव्यांच्या तुलनात्मक तक्त्यात आपण भात, गहू मका व नाचणी इ. धान्यातील पोषण घटकांची

नाचणीमध्ये इतर धान्याच्या तुलनेत सर्वांत जास्त तंतुमय पदार्थ आहे. (३.६ ग्रॅम). तंतुमय पदार्थामुळे पोट साफ ठेवण्यास

तसेच अन्नप्रक्रिया सुरळीत ठेवण्यास मदत होते. तसेच पोटाचे विकार तंतुमय पदार्थामुळे होत नाही. नाचणीमध्ये कबोंदकाचे प्रमाण ७२ टक्के असून ते नॉनस्टॉरच्या स्वरूपात असते. तंतुमय पदार्थाचे नाचणीतील प्रमाण जास्त असल्यामुळे ते रक्‍तातील ग्लुकोजचे प्रमाण कमी करण्यास मदत करते त्यामुळे मधुमेह व्यक्तीसाठी नाचणी ही उत्तम समजल्या जाते.

See also  वि.दा सावरकर यांच्याविषयी माहीती - V D Savarkar Information In Marathi

नाचणीमध्ये सर्वांत जास्त कॅल्शियम (३४४ मि.प्रॅ./१०० ग्रॅम) हे पोषकद्रव्य आहे. कॅल्शियम हे हाडे मजबूत होण्यासाठी उपयोगाचे असतात. गर्भवती महिलेसाठी व तिच्या बाळांची हाडे मजबूत होण्यासाठी नाचणी उपयोगाची ठरते. नाचणी पचण्यास हलकी असल्यामुळे सर्व वयोगटातील व्यक्‍ती नाचणीचे सेवन करू शकतात.

आदिवासी भागातील महिलांसाठी नाचणी हे तर वरदानच आहे. नाचणीच्या सेवनाने ओस्टेओपोरोसीस हा हाडाचा रोग होत नाही.

भात, गहू व मका या धान्यापेक्षा जास्त प्रमाणात नाचणीमध्ये लोह हे पोषणद्रव्य (६.४ मि.ग्रॅ./१०० ग्रॅम) आहे. नाचणी हे नैसर्गिक लोह मिळविण्याचे एक चांगले साधन आहे. नाचणीच्या सेवनाने रक्तक्षय कमी होण्यास मदत होते. गरोदर काळात गभाचा विकास होण्यासाठी तसेच स्तनदा मातेसाठी लोहाची खूप आवश्यकता असते अशा वेळेस नाचणी हा लोहाचा उत्तम स्रोत आहे.

नाचणीमध्ये शरीराला आवश्यक असणारी महत्त्वाची अशी आमिनो आम्ले आहेत.

ज्या व्यक्‍ती पूर्णतः शाकाहारी आहेत अशा व्यक्‍तीच्या आहारात या वॅलिन हे आवश्यक अमिनो अँसिड आहे.

पेशींची दुरुस्ती, चयापचय क्रियेसाठी तसेच शरीरातील नायट्रोजनचे प्रमाण नियंत्रित ठेवण्याचे काम वॅलिन हे आम्ल करते.

  • वॅलिनचा वापर करून मानसिक थकवा कमी करून मज्ञासंस्थेचा जोम वाढविता येतो.
  • शरीरातील झीज भरून काढण्यासाठी उपयुक्‍त.

आयसोल्युसिन

  • आम्ल शरीरात रक्‍त तयार होण्यासाठी आवश्यक असते.
  • रक्‍तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवून मधुमेहावर नियंत्रण ठेवते.
  • तसेच नाचणीतील आयसोलेसिन आम्ल शरीरातील स्नायुंच्या पेशींची दुरुस्ती व त्यांना निरोगी ठेवण्याचे काम करते.
  • आयसोलोसिन मांसपेशी तंदुरुस्त, रक्‍त गठन, हाडांची शक्‍ती आणि

त्वचा सुधारण्यास मदत करते.

थ्रेओनीन

  • हे आम्ल शरीरातील प्रथिनांचे प्रमाण नियंत्रित ठेवण्याचे काम करते.
  • दातावर चकाकी आणण्यासाठी याचा उपयोग होतो.
  • यकृतामध्ये स्निग्ध पदार्थ तयार होऊ नये यासाठी मदत करते.

ट्रिप्टोफॅन

  • मानवी शरीरातील काळजी, ताण व निद्रानाश यांच्या विरुद्ध हे आम्ल काम करते.
  • त्याचबरोबर तीव्र डोकेदुखीवर या आम्लाचा वापर होतो.

मेथीओनीन

  • हे आम्ल त्वचा व केसांचे आरोग्य संतुलित ठेवण्याचे काम करते.
  • रक्तातील कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी या आम्लाचा उपयोग होतो.
  • शरीरामध्ये गंधक उपलब्ध करण्यासाठी उपयुक्‍त.
See also  छत्रपती संभाजी महाराज जयंती शुभेच्छा संदेश तसेच कोटस - Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti 2023

नाचणी सत्व-Nachani information in Marathi

प्रत्येकाला आपल्या आहारात नाचणीचा समावेश करून समृद्ध व सुटूढ आयुष्य जगात येऊ शकते.

अशा पोषणद्रव्याने समृद्ध असणाऱ्या नाचणीचा उपयोग आरोग्य सुधारणे साठी नक्कीच करता येऊ शकतो. प्रत्येकाला आपल्या आहारात नाचणीचा समावेश करून समृद्ध व सुटूढ आयुष्य जगात येऊ शकते.

ना हे तृणधान्य पोषणसमृद्ध आहे. राष्ट्रीय पोषण संस्था, हैदराबादच्या संदर्भानुसार १०० ग्रॅम नाचणीमध्ये ७.३ ग्रॅम प्रथिने, १.३ ग्रॅम स्निग्ध पदार्थ, ३.६ ग्रॅम तंतुमय पदार्थ, ७२ ग्रॅम कर्बोदके, २.७ ग्रॅम एकूण खनिजद्रव्ये, ३४४ मि.ग्रॅ. कॅल्शियम, ३.९ मि.ग्रॅ. लोह, १३७ मि.पॅ. मॅग्नेशिअम, ११ मि.ग्रॅ. सोडियम, ४०८ मि.ग्रॅ. पोटेशियम, २.३ मि.ग्रॅ. झिंक, ०.४२ मि.ग्रॅ. थायमिन, ०.१९ मि.पॅ. रायबोफ्लोविन, १.१ मि.ग्रॅ. नायसिन, ५.२ मायक्रोग्रॅम फॉलिक अँसिड असते.

नाचणीच्या पोषणमूल्याचा अभ्यास केला असता असे लक्षात येते की नाचणीमध्ये गहू, तांदूळ आणि ज्वारीच्या तुलनेत खनिजद्रव्ये विशेषतः कॅल्शियम, फॉस्फरस, पोटॅशियम, झिंक कॅरोटिन तसेच थायमीन व तंतुमय पदार्थांचे प्रमाण जास्त असते. कॅल्शियम आणि फॉस्फरस ही खनिजे हाडेआणि दातांच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहेत.


पुस्तके – फिशिंग

2 thoughts on “नाचणी पिकाचे खाण्याचे फायदे :नाचणी च आहरातील फायदे (Nachani information in Marathi)”

  1. नागली पिकाचे आहारातील महत्व व फायदे ,आजच्या रोजच्या धावपळीत आपण सर्व जण योग्य आहाराकडे दुर्लक्ष्य करतो व आपले बहुमूल्य असे आरोग्य धोक्यात आणतो , वेळे अभावी आपण जे फास्ट फूड खातो त्यामुळे आपण वेगवेगळ्या आजाराला निमंत्रण देत असतो नाचणी हे असे एक अन्न आहे कि जे आपणास जीवनसत्वे भरपूर प्रमाणात मिळतात ,खरोखरच आपण सर्वानी आपल्या आहारात नाचणीचा समावेश केला पाहिजे

Comments are closed.