प्रधानमंत्री फ्री शिलाई मशीन योजना – PM Free Sewing Machine Scheme Mahiti

प्रधानमंत्री फ्री शिलाई मशीन योजना – PM Free Silai Machine Scheme

अनेकदा आपण महिलांचे सबलीकरण व्हायला हवे असे बोलतो मात्र त्यासाठी महिलांना स्वतःच्या पायावर कसे उभे करता येईल याकडे मात्र दुर्लक्ष होत असते. महिलांना त्यांच्या कुटुंबाचे पालन पोषण करता यावे यासाठी अनेक योजना केंद्र सरकार आणि राज्यसरकार आणत असते. त्यापैकीच एक म्हणजे पंतप्रधान फ्री शिलाई मशिन योजना 2021 होय.

महिलांना या योजनेच्या माध्यमातून एक घरात बसून काम मिळेल आणि त्यातुन त्या त्यांच्या कलेतून पैसे कमावून आपल्या कुटुंबाचे पालन पोषण सहज करु शकतात. आजच्या या लेखाच्या माध्यमातून आपण प्रधानमंत्री फ्री शिलाई मशिन योजना 2021 (PM Free Silai Machine yojana 2021) विषयी सर्व काही माहिती सविस्तरपणे जाणून घेणार आहोत.

आज आपण या लेखाच्या माध्यमातून PM Free Sewing Machine Scheme Mahiti

 • प्रधानमंत्री फ्री शिलाई मशिन योजना 2021 काय आहे, कोणासाठी आहे,
 • पात्रता काय आहे,
 • कोणते कागदपत्र गरजेचे आहेत,
 • योजनेचा लाभ आणि फायदे,
 • फॉर्म भरण्याची प्रक्रिया (PM free Silai Machine Yojana 2021 Process, Benefits, Required Documents, Eligibility in Marathi) याविषयी जाणून घेणार आहोत.

प्रधानमंत्री फ्री शिलाई मशीन योजनेचे उद्दिष्ट्ये काय आहे?

 • प्रधानमंत्री फ्री शिलाई मशीन योजनेच्या अंतर्गत फॉर्म भरणाऱ्या महिलांना शिलाई मशिनचे मोफत वाटप करून त्यांना एक रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातील.
 • या योजनेच्या माध्यमातून केंद्र सरकारचे मुख्य उद्दिष्ट हेच आहे की महिलांना रोजगार मिळून त्या सक्षम बनू शकतील. आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर भारत हा मंत्र दिला आहे आणि त्याचाच एक भाग म्हणजे आपल्या महिला स्वावलंबी बनून त्यांच्या जीवनात ते बदल करू शकतील.
 • आपल्या ग्रामीण भागात अनेक अशा स्त्रिया आहेत ज्या मुलांच्या शिक्षणासाठी आणि पालन पोषणासाठी शेतात कष्ट करत असतात मात्र त्यातून त्यांचा उदरनिर्वाह होऊ शकत नाही.
 • साठी एक आणखी रोजगार हु योजना देणार आहे, जेणेकरून त्यांच्या उदरनिर्वाह होण्यास थोडासा हातभार लागू शकेल.
See also  एसटी मधुन हाफ तिकिट सवलतीमध्ये प्रवास करण्याचे प्रमुख नियम अणि अटी - 50 percent discount to women on st bus ticket rules of scheme in Marathi

प्रधानमंत्री फ्री शिलाई मशीन योजनेपासुन होणारे फायदे

 • प्रधानमंत्री फ्री शिलाई मशिन योजना 2021 मध्ये अर्ज करणाऱ्या पात्र उमेदवार महिलांना केंद्र सरकारकडून पंतप्रधान निधीमधून एक शिलाई मशिन फ्री दिली जाईल.
 • तुम्ही ग्रामीण भागात असाल किंवा शहरी भागात,या योजनेचा लाभ कोणत्याही भागात राहणाऱ्या महिला घेऊ शकतात. महिला या मशिनचा वापर करून कपडे वैगेरे शिवणकाम करून पैसे कमवू शकतात.
 • महिलांसाठी या आधी देखील सरकारने अनेक योजनांमधून कमीत कमी खर्चात शिवनकामाचे प्रशिक्षण देखील दिले होते.

प्रधानमंत्री फ्री शिलाई मशीन योजनेसाठी लागणारी पात्रता – PM Free Sewing Machine Scheme Mahiti

 • प्रधानमंत्री फ्री शिलाई मशीन योजना 2021 योजना महिलांसाठी आहे. यामध्ये महिलांचे वय 20 वर्ष ते 40 वर्ष मध्ये असणे आवश्यक आहे.
 • महिला अपंग असेल किंवा विधवा असेल तर त्या महिलांना जास्तीत जास्त प्राधान्य दिले जाईल. मुख्यतः ही योजना अशाच महिलांना सक्षम बनविण्यासाठी सुरू करण्यात आलेली आहे.
 • पात्र होण्यासाठी तुम्हाला डॉक्टर कडून मिळालेला अपंगत्वाचा दाखला देखील लागेल.
 • महिला विधवा असेल तर तिच्याकडे विधवा असल्याचे प्रमाणपत्र किंवा पुरावा असावा.
 • महिलांचे वार्षिक उत्पन्न हे 12 हजारापेक्षा जास्त नसले पाहिजे. म्हणजे त्यासाठी तुम्हाला कागडपत्रांमध्ये त्या महिलेच्या नावाने 12 हजारापेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेला उत्पन्नाचा दाखला देखील गरजेचा आहे.

प्रधानमंत्री फ्री शिलाई मशीन योजनेचा लाभ घेण्यासाठी लागणारी कागदपत्रे

योजनेसाठी पात्र होण्यासाठी लागणारी कागदपत्रांची यादी-

 1. आधार कार्ड
 2. वय दर्शविणारे एखादे प्रमाणपत्र
 3. उत्पन्नाचा दाखला
 4. ओळख पत्र
 5. अपंगत्वाचे प्रमाणपत्र
 6. विधवा महिला प्रमाणपत्र
 7. जातीचा दाखला
 8. पासपोर्ट साईझचा फोटो
 9. मोबाईल क्रमांक

प्रधानमंत्री फ्री शिलाई मशीन योजनेसाठी विनाशुल्क अर्ज कसा करायचा? – PM Free Sewing Machine Scheme Mahiti

योजनेसाठी अर्ज करायला तुम्हाला खालील स्टेप्स फॉलो करायच्या आहेत.

 • सर्वात आधी केंद्रसरकारच्या ऑफिशियल वेबसाईटवर जावे.लिंक- india.gov.in
 • वेबसाइटवरून तुम्ही प्रधानमंत्री फ्री शिलाई मशीन योजनेसाठी लागणारा फॉर्म डाऊनलोड करू शकता.
 • त्यासाठी तुम्हाला विचारली जाणारी सर्व माहिती भरायची आहे. वर सांगितलेल्या सर्व कागदपत्रांमधून तुम्हाला ती माहिती मिळेल.
 • तुम्ही त्यानंतर त्या फॉर्मची एक प्रत काढून तिला सांगितलेल्या आवश्यक कागदपत्रांसोबत सांगितलेल्या जवळच्या सरकारी कार्यालयात जमा करायची आहे.
 • तेथील अधिकारी ते तपासून तुमचा फॉर्म अप्रुव्ह करतील. त्यानंतर तुम्हाला मोफत शिलाई मशिनचे वाटप केले जाईल.
See also  आपल्याला रेशन किती मिळते हे कुठे अणि कसे चेक करायचे? - How can I check my ration quota in Maharashtra?

प्रधानमंत्री शिलाई मशीन योजना कोणकोणत्या राज्यांत लागु करण्यात आली आहे?

प्रधानमंत्री फ्री शिलाई मशिन योजना ही संपूर्ण देशभरात लागू असणार आहे परंतु सुरुवातीच्या टप्प्यात केंद्र सरकारने काही ठराविक राज्यांमध्ये हा प्रयोग राबविण्याचे ठरविले आहे

 खालील राज्यांमध्ये सध्या ही प्रधानमंत्री मोफत शिलाई मशिन योजना सुरू करण्यात आलेली आहे.

 • महाराष्ट्र
 • गुजरात
 • कर्नाटक
 • हरियाणा
 • राजस्थान
 • उत्तर प्रदेश
 • मध्य प्रदेश
 • छत्तीसगड
 • बिहार

प्रधानमंत्री फ्री शिलाई मशीन योजनेसाठी आँनलाईन अर्ज कसा करायचा?

 • केंद्र सरकारच्या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला फ्री शिलाई मशिन योजनेसाठी अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया वर दिलेली आहे.
 • तुम्हाला फक्त त्या वेबसाईटवर जाऊन तो फॉर्म डाउनलोड करायचा आहे आणि त्यामध्ये गरजेची माहिती भरायची आहे.

प्रधानमंत्री फ्री शिलाई मशीन योजनेची वैशिष्टये

 • कमी उत्पन्न असणाऱ्या महिलांसाठी ही योजना आहे आणि त्यामुळे त्यांचे सक्षमीकरण हे होऊ शकते.
 • अपंग आणि विधवा महिलांसाठी प्राधान्य दिले जाणार आहे. पहिल्या टप्प्यात सर्वत्र अपंग आणि विधवा महिलांसाठी ही योजना आहे.
 • मोफत शिलाई मशिन महिलांना दिले जाणार आहे जेणेकरून त्या स्वतःचा काहीतरी व्यवसाय सुरू करू शकतील.
 • 50 हजार पेक्षा जास्त महिलांसाठी ही योजना असणार आहे त्यामुळे सध्या ठरविल्या गेलेल्या राज्यांमधील सर्व गरजू महिलांसाठी ही योजना पोहोचवली जाणार आहे.

प्रधानमंत्री फ्री शिलाई मशीन योजनेविषयी माहीती प्राप्त करण्यासाठी संपर्क क्रमांक

 • योजनेसाठी संपर्क क्रमांक जाहीर केले नाहीत. तुम्ही खाली दिलेल्या पत्त्यावर पत्रव्यवहार करू शकता.

टेक्निकल टीम

नॅशनल इन्फॉर्मेटिकस सेंटर,

A4B4, तिसरा मजला, A ब्लॉक,

CGO कॉम्प्लेक्स, लोधी रोड,

नवी दिल्ली – 110003

(क्रमांक माहीत नसल्याने तुम्ही तक्रार आणि अभिप्राय या पर्यायांचा वापर संपर्कासाठी करू शकता)

प्रधानमंत्री फ्री शिलाई मशीन योजनेत – FAQ

 • प्रधानमंत्री फ्री शिलाई मशीन योजनेत सहभागी होण्यासाठी वयाची अट

प्रधानमंत्री फ्री शिलाई मशिन योजना 2021 ही वय वर्ष 20 ते 40 वयोगटातील महिलांसाठी आहे.

 • प्रधानमंत्री फ्री शिलाई मशीन योजनेची सुरूवात कोणी केली?
See also  महाराष्ट्र सरकार देत आहे विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी ५१ हजार रुपये - Swadhar Yojana In Marathi

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री फ्री शिलाई मशिन योजनेची सुरुवात केली.

 • प्रधानमंत्री फ्री शिलाई मशीन योजनेसाठी कोण कोण अर्ज करू शकते?

20 ते 40 वयोगटातील अपंग किंवा विधवा महिला या योजनेसाठी अर्ज करू शकतात. सध्या योजना काही राज्यांमध्ये लागू झालेली आहे त्यामुळे तुमच्या राज्याचे नाव या यादीत आहे किंवा नाही हे तपासून बघावे.

 • प्रधानमंत्री फ्री शिलाई मशीन योजनेविषयी आपला प्रतिसाद कसा आणि कुठे व्यक्त करायचा?

केंद्रसरकारच्या मुख्य वेबसाईटवर तुम्हाला होम पेजवर सर्वात खाली गेल्यानंतर Give Feedback हा पर्याय दिसेल. त्यावर तुम्हाला क्लीक करायचे आहे. पुढे तुमच्या समोर एक फॉर्म ओपन होईल. यामध्ये तुम्हाला तुमचे नाव, त्यानंतर अभिप्राय किंवा प्रतिसाद आणि कॅपचा कोड टाकून तुमचा प्रतिसाद नोंदवायचा आहे. त्यासाठी Submit हे बटन खाली दिलेले आहे.

Submit केल्यानंतर तुमचा प्रतिसाद हा त्यांच्यापर्यंत पोहचला जाईल.

 • प्रधानमंत्री फ्री शिलाई मशीन योजनेविषयी आपली तक्रार कशी आणि कुठे नोंदवायची?

तुम्हाला जर या योजनेच्या संबंधित काही तक्रार करायची असेल तर त्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा.

अधिकृत वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला खाली स्क्रोल करायचे आहे.

शेवटी तुम्हाला Public Grievance हा पर्याय दिसेल. या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल. 

 • तुम्ही जेव्हा फॉर्म भरता तेव्हा तुम्हाला एक username आणि password मिळाला असेल. तो इथे टाकून त्यानंतर सिक्युरिटी साठी असलेला कॅपचा टाकायचा आहे.

लॉगिन झाल्यानंतर तुम्हाला समोर Grievance फॉर्म दिसेल. या फॉर्म मध्ये तुम्ही हवी ती माहिती आणि त्यासोबत तुमची तक्रार भरून Submit करू शकता.

तुमच्या तक्रारीचे निवारण हे तुमच्या मोबाईल क्रमांकावर संपर्क करून केले जाईल.

Leave a Comment