RIP म्हणजे काय? RIP meaning in Marathi

RIP चा अर्थ काय? RIP meaning in Marathi

आर आय पी हा एक असा शब्द आहे जो आपण सोशल मिडियावर एखाद्या मृत व्यक्तीच्या फोटो आणि नावाच्यापुढे कोणाच्याही स्टेटसला लिहिलेला बघत असतो.

जेव्हा अभिनेता सुशांत सिंग राजपुत याच्या मृत्युची वार्ता सगळीकडे पसरली तेव्हा देखील व्हाँटस अँपवर,युटयुब चँनल्सवर,इंस्टाग्रामवर हा एकच शब्द आपल्याला सगळीकडे पाहायला मिळत होता.

तेव्हासुदधा आपल्यापैकी खुप जणांच्या मनात हा प्रश्न निर्माण झाला होता की सुशांत सिंग हे तर त्या मृत अभिनेत्याचे नाव आहे.

पण त्याच्या नावा आणि फोटोपुढे आर आयपी असे का लिहिले गेले आहे?आणि हे एकाच व्यक्तीच्या नव्हे तर मृत झालेल्या प्रत्येक अभिनेता,स्टार्सच्या नावापुढे त्याच्या फोटोपुढे आर आयपी असे लिहिलेले आपणास दिसुन येते.

तेव्हा खुप जणांना असे देखील वाटत होते की आर आयपी ही नक्कीच एखादी पदवी तसेच उपाधी असावी जी लोक त्या व्यक्तीला मेल्यानंतर बहाल करतात.

पण आपण विचार करतो असा कोणताही पद उपाधी असा याचा अर्थ होत नाही.

म्हणुन आजच्या लेखात आपण आर आयपी म्हणजे काय?प्रत्येक मृत व्यक्तीच्या नावापुढे तसेच फोटोपुढे आर आयपी असे का लिहिले जाते?इत्यादी सविस्तरपणे जाणुन घेणार आहोत.

RIP म्हणजे काय?

  • आर आय पी ह्या शब्दाचा फुल फाँर्म (rest in peace) असा होत असतो.
  • Rest म्हणजेच विश्रांती,आराम आणि peace म्हणजे शांतता.म्हणजेच या दोघे शब्दांचा मिळुन शांततेत विश्रांती घ्या असा अर्थ होत असतो.
  • जेव्हा एखादी व्यक्ती मृत्यु पावते तेव्हा मृत्युनंतर त्याच्या आत्म्याला शांती मिळावी त्याला कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये.अशी प्रार्थना करण्यासाठी त्याच्या स्मशानातील कबरेवर RIP असे लिहिले जात असते.
  • RIP ह्या शब्दाचा वापर मुख्यकरून ईसाई धर्मात करतात.कारण ईसाई धर्मात मेल्यानंतर एखाद्या व्यक्तीला अग्नीदहन न करता त्याचे मृत शरीर स्मशानात पुरतात.
See also  शिक्षक दिन कोटस शुभेच्छा संदेश -Teachers Day Quotes,Messages And Wishes In Marathi

RIP ह्या शब्दाचा इतिहास काय आहे?

  • आर आय पी ह्या शब्दाची निर्मिती (requiescat in peace) या लँटिन भाषेतील शब्दापासुन झाली.आर आयपी हा शब्द सर्वात  आधी 16 व्या शतकात पश्चिम देशांत करण्यात आला होता.
  • याचा पुरावा तसेच साक्ष मेलेल्या व्यक्तीला जमीनीत पुरल्यानंतर त्यावर ठेवल्या जात असलेल्या दगडावर प्राप्त झाली होती.
  • आर आयपी ह्या शब्दाचा वापर करण्यास सगळयात आधी ईसाई धर्मातील लोकांनी सुरूवात केली.ईसाई धर्मातील लोक मेलेल्या व्यक्तीच्या आत्म्याला मृत्युनंतर कोणताही त्रास होऊ नये अशी प्रार्थना करण्यासाठी तसेच मेलेल्या व्यक्तीप्रती शोक आणि सहानुभुती व्यक्त करण्यासाठी म्हणुन आर आयपी असे त्याच्या स्मशानातील कबरेवर लिहु लागले.

RIP च्या ठिकाणी भारतात इतर कोणते शब्द वापरले जातात?

आर आयपीच्या ठिकाणी पुढील शब्द वापरले जातात:

● परमेश्वर कृपेने तुझ्या आत्म्याला शांती लाभावी

● तुझा आत्मा स्वर्गात जावो.देवाने तुला स्वर्गात जागा द्यावी

● तुला मोक्ष प्राप्त व्हावी

RIP ह्या शब्दाचे इतर फुलफाँर्म पुढीलप्रमाणे आहेत:

● Routing information protocol

● Refractive index profile

● Raster image processor

● Regulation of investigation power

RIP ह्या शब्दाविषयी भारतात कुठला वाद आहे?

  • आर आयपी हा शब्द पाश्चिमात्य संस्कृतीतील लोक तसेच विशेषकरून ईसाई धर्मीय मृत व्यक्तीच्या आत्म्याला शांती प्राप्त व्हावी म्हणुन वापरतात.
  • पण आर आयपी हा शब्द हिंदु संस्कृतीत कुठेच वापरला जात नाही.हिंदु संस्कृतीत एखादी व्यक्ती मेल्यावर परमेश्वर कृपेने तुझ्या आत्म्यास शांती लाभो असे म्हटले जाते.किंवा मृत व्यक्तीला श्रदधांजली अपर्ण असे लिहिले जाते.
  • पण सध्या खुप हिंदु धर्मीय लोक मृत व्यक्तीला श्रदधांजली अपर्ण करण्यासाठी आर आयपी हा शब्द सरार्सपणे वापरत आहे.त्यामुळेच हा एक वादाचा विषय ठरला आहे.

RIP ह्या शब्दाचा खरा धार्मिक अर्थ काय आहे?

  • हे मृत आत्मा तुझे शरीर जमिनीत पुरले जात आहे.कयामतच्या दिनी उपरवाला तुझ्यासोबत योग्य तो न्याय करेल.तो पर्यत तु जमिनीत शांतपणे पडुन राहा आणि कयामतचा दिवस येण्याची वाट बघ.
  • कारण गाडणारे व्यक्ती पुर्नजन्मावर विश्वास ठेवत नाही.म्हणुन कयामत पर्यत त्या मृत व्यक्तीची सुटका होणार नाही असे पाश्चिमात्य तसेच ईसाई लोक मानतात.
See also  सोलो ट्रिप करण्याचे फायदे - Solo trip benefits in Marathi

RIP हा शब्द भारतात कधीपासुन वापरला जाऊ लागला?

  • इ.स 16 मध्ये इंग्रजांनी जेव्हा भारतात आपले प्रथम पाऊल टाकले तेव्हा त्यांचा भारतात व्यापार करणे एवढाच नव्हता तर भारतात ईसाई धर्माचा प्रचार-प्रसार करणे हा देखील होता.
  • आणि मग इंग्रजांनी जेव्हा भारतात आपले साम्राज्य स्थापित केले तेव्हा मग कालांतराने इंग्रज आपल्या प्रथा परंपरांचा विस्तार करावयास आरंभ केला यासाठी त्यांनी जागोजागी चर्च उभारले.ख्रिस्ती धर्मीय शाळा सुरू केल्या.
  • आणि ब्रिटीशांत अशी परंपरा होती की एखादी व्यक्ती मृत झाल्यावर ते त्याच्या देहाला जमिनीत गाडायचे आणि त्यावर आर आयपी असे लिहायचे हीच प्रथा ब्रिटिशांनी भारतात देखील ब्रिटीश व्यक्तीचा मृत्यु झाल्यावर पाळणे सुरू केले.
  • आणि मग ह्याच ब्रिटीश परंपरेचा प्रभाव भारतीयांवर देखील होऊ लागला.आणि भारतीय देखील मेल्यावर मृत व्यक्तीला श्रदधांजली अपर्ण करण्यासाठी आर आयपी असे लिहु लागले.