भारतातील टाँप 10 दमदार मायलेज बाईक्स -Top 10 Bikes Marathi Information

भारतातील दमदार बाईक्स -Top 10 Bikes Marathi Information

आज आपल्याला प्रत्येकाला बाईक चालवायला आवडते आणि बाईक वर बसुन लाँग ड्राईव्हला फिरायला जायला आवडते पण अनेकदा आपल्याला जास्त इंधन लागेल अशी भीती वाटते म्हणुन आपण बाईक्सवर जास्त दुर कुठेही प्रवास करणे टाळत असतो.

आणि जेव्हाही आपण कोणतीही मोटारसायकल खरेदी करण्याचे ठरवत असतो.तेव्हा आपण सगळयात आधी बाईकचा मायलेज किती आहे?इंजिन पाँवर किती आहे इत्यादी आधी चेक करून सविस्तरपणे जाणुन घेत असतो.

कारण सध्या पेट्रोल डिझेलचे भाव दिवसेंदिवस गगनाला भिडत आहे.म्हणजेच इंधन दरवाढीची डोकेदुखी सर्वसामान्य व्यक्तीला जाणवताना दिसुन येत आहे.

म्हणुनच आजच्या लेखातुन आपण आज काही अशा टाँप 10 माईलेज बाईक्सची नावे जाणुन घेणार आहोत.

ज्यांची गणना भारतातील टाँप 10 माईलेज बाईक्स म्हणुन केली जाते एवढया ह्या प्रख्यात आहेत.

भारतातील टाँप 10 मायलेज बाईक्सची नावे कोणकोणती आहेत?

भारतातील टाँप दहा अशा माईलेज बाईक्सची नावे पुढीलप्रमाणे आहे :

1)Bajaj Ct 100

2) Honda Dream Yuga

3) Tvs Victor

4) Bajaj Discover 110

5) Tvs Sport

6) Bajaj Platina 100

7) Tvs Star City Plus

8) Yamaha Saluto Rx

9) Hero Splender Plus

10) Tvs Radeon

1)Bajaj Ct 100 :

बजाज सीटी हंड्रेडचा नंबर भारतातील टाँप 10 मायलेज बाईक्सच्या यादीत दुसरा ते तिसरा आहे.

बजाज सिटी हंड्रेडचे मायलेज हे 90 Kmpl इतके असलेले आपणास दिसुन येते.

बजाज सीटी हंड्रेड ह्या बाईकमध्ये ट्रस्ट्रेड एअर कुल्ड,सिंगल सिलेंडर इंजिन आहे. आणि ही बाईक आपल्याला निळया,लाल आणि काळयासोबत लाल तसेच काळयासोबत निळा अशा रंगात उपलब्ध होते.ह्या बाईकची साधारणत किंमत 35,408 आहे.

बजाज सिटी हंड्रेडची लांबी 1946 मिमी इतके आहे.हिचा ग्राऊंड क्लीयरस 170 मिमी आणि व्हीलबेस देखील 1236 मिलीमीटर असलेला आपणास दिसुन येतो.

2) Honda Dream Yuga :

होंडा ड्रिम युगा ह्या बाईकची इंधन कार्यक्षमता चांगली आहे.आणि ह्या बाईकचे मायलेज देखील 86 Kmpl इतके आहे.

See also  World Book Day Matathi Quotes - भारतातील महान व्यक्तींचे ग्रंथा विषयी असलेले महान विचार - Inspirational thoughts about books in Marathi by greatest Indian legends

यात फोर स्पीड ट्रान्समिशन आणि सिंगल सिलेंडर इंजिन देखील आहे.

ह्या बाईकच्या इंजिन क्षमतेविषयी सांगावयास गेले तर 108.18 Cc इतकी आहे.

आणि ह्या बाईकची किंमत साधारणत अंदाजे 60,332 इतकी आहे.

ड्रीम युगा ही बाईक होंडा कंपनीची उप कंपनी म्हणुन ओळखल्या जात असलेल्या एच एम सीएल कंपनी द्वारे निर्माण केली गेली आहे.

3) Tvs Victor :

टीव्ही एस व्हिक्टर ही बाईक भारतातील टाँप मायलेज बाईक्समध्ये आठव्या ते नवव्या क्रमांकावर असलेली आपणास दिसुन येते.

ह्या बाईकचे मायलेज 72 Kmpl इतके असल्याचे आपणास आढळुन येते.

ह्या बाईकची इंजिन क्षमता 110.80 Cc इतकी असते.आणि किंमत 55,026 इतकी आहे.

4) Bajaj Discover 110 :

बजाज डिस्कव्हर 110 ही बाईक दिसायला देखील चांगली आहे आणि ह्या बाईकची इंधन कार्यक्षमता देखील चांगली असलेली आपणास दिसुन येते.

बजाज डिस्कव्हर ह्या बाईकचे मायलेज 70 Kmpl इतके आहे.

एवढेच नाही तर ह्या बाईकवर 7000 आरपीएम वर 8.5 Bhp ची पाँवर रेटिंग असलेली आपणास आढळुन येते.

ह्या बाईकच्या इंजिन क्षमतेविषयी सांगायचे म्हटले तर ह्या बाईकची इंजिन क्षमता116.5cc इतकी आहे तसेच ही बाईक आपल्याला अंदाजे 54,812 ह्या किंमतीत बाजारात उपलब्ध होते.

5) Tvs Sport :

ज्या व्यक्तीला बाईकवरून नियमित प्रवास करत असताना आपल्या पैशांची बचत करायची असेल ते असे व्यक्ती आपली पहिली पसंती ह्या बाईकलाच देतात.

टीव्हीएस स्पोर्ट बाईक ही भारतातील टाँप दहा बाईक्सच्या यादीत पहिल्या ते दितीय क्रमांकावर असलेली दिसुन येते.

ह्या बाईकचे माईलेज देखील उत्तम आहे.ह्या बाईकचे मायलेज 94 Kmpl इतके आहे.

यात आपल्याला सिंगल सिलेंडर,एयर कुल्ड इंजिन असलेले दिसुन येते.आणि ह्या बाईकची इंजिन क्षमता 100 Cc इतकी आहे.

आणि ह्या बाईकची किंमत देखील अंदाजे 40,000 इतकी आहे.

6) Bajaj Platina 100 :

बजाज प्लटिना 100 ह्या बाईकचा भारतातील टाँप दहा मायलेज बाईक्समध्ये दुसरा क्रमांक लागताना आपणास दिसुन येतो.

See also  मालमत्ता कराविषयी माहीती - Property tax information in Marathi

आणि ह्या बाईकचे मायलेज देखील 92 Kmpl इतके आहे.ही बाईक आपल्याला बाजारात एकुण दोन रंगात उपलब्ध होते एक काळा आणि दुसरा लाल.

ही बाईक बजाज आँटो ह्या कंपनीकडुन तयार करण्यात आलेली आहे.

7) Tvs Star City Plus :

भारतातील टाँप मायलेज असलेल्या बाईक्समध्ये टीव्हीएस स्टार सीटी प्लस ह्या बाईकचा तिसरा ते चौथा क्रमांक लागतो.

ह्या बाईकचे माईलेज 85 Kmpl इतके आहे.ह्या बाईकची इंधन कार्यक्षमता देखील उत्तम आहे.

टीव्ही एस स्टार सिटी प्लस ह्या बाईकची इंजिन क्षमता 108.8 Cc आहे.आणि ह्या बाईकची किंमत देखील 54,046 इतकी आहे.

8) Yamaha Saluto Rx :

भारतातील टाँप दहा मायलेज बाईक्समध्ये यमाहा साँल्युटो आर एक्स ह्या बाईकचा देखील समावेश होतो.

यमाहा साँल्युटो आर एक्स ह्या बाईकचे माईलेज 83 Kmpl आहे.

ह्या बाईकची इंजिन क्षमता 112 Cc इतकी आहे.आणि ह्या बाईकची किंमत देखील बाजारात 60,890 इतकी असलेली आपणास दिसुन येते.

ही बाईक आपल्याला सहा रंगांमध्ये बाजारात उपलब्ध होते.

9) Hero Splender Plus :

भारतातील टाँप मायलेज असलेल्या बाईक्समध्ये हिरो स्प्लेंडर प्लसचा आठवा क्रमांक लागताना आपणास दिसुन येतो.

ह्या बाईकचे मायलेज 82 Kmpl इतके आहे.आणि ह्या बाईकची इंजिन क्षमता देखील 98.3 Cc इतकी असलेली आपणास दिसुन येते.

आणि ही बाईक बाजारात 54,790 इतक्या किंमतीत आपणास उपलब्ध होते.

10) Tvs Radeon :

टीव्हीएस रँडियन ही भारतातील टाँप दहा मायलेज बाईक्सपैकी एक म्हणुन ओळखली जाते.

ह्या बाईकचे मायलेज 71 Kmpl इतके आहे.ह्या बाईकचे मायलेज तर चांगले आहे सोबतच ड्रम ब्रेक,फोर स्पीड ट्रान्समिशन,ट्युबलेस टायर्स तसेच सेल्फ स्टार्ट अशी अनेक वैशिष्टये ह्या बाईकमध्ये असलेली आपणास दिसुन येते.

ही बाईक बाजारात चार रंगांमध्ये आपल्याला उपलब्ध होते.आणि ह्या बाईकची इंजिन क्षमता 108.8 Cc इतकी आहे तसेच बाजारात ही बाईक आपल्याला 50,830 मध्ये उपलब्ध होत असते.

See also  टोलुना इंफ्लुएन्सर म्हणजे काय - Toluna influencers meaning in Marathi

अशा पदधतीने आज आपण भारतातील टाँप दहा मायलेज बाईक्सविषयी माहीती जाणुन घेतली आहे.

ह्या यादीमध्ये चांगला मायलेज प्रदान करत असलेल्या तसेच ज्या बाईकची इंजिन क्षमता देखील चांगली आहे अशा काही टाँप बाईक्सविषयी आज माहीती जाणुन घेण्याचा प्रयत्न केला आहे.

प्रत्येक बाईकचालकाने आपल्या आवडीची बाईक खरेदी करत असताना सर्व प्रवेशयोग्य शक्यतांचे मोजमाप करुनच योग्य ती बाईक खरेदी करायला हवी.

नवीन बाईक खरेदी करत असताना आपण कोणती काळजी घ्यायला हवी?

बाजारात आलेली कोणतीही नवीन बाईक खरेदी करत असताना आपण खालील काळजी घेणे खुप आवश्यक असते.

  • जेव्हाही आपण नवीन बाईक खरेदी करत असतो तेव्हा आपण बाईकचा अँव्हरेज,इंजिन क्षमता,मायलेज स्पीड किंमत इत्यादी चेक करण्यासोबत बाईकवर कुठे स्क्रँच वगैर आहे का हे देखील एकदा चेक करून घ्यायला हवे.
  • कोणतीही बाईक खरेदी करत असताना आपण तिचे मीटर देखील चेक करायला हवे.आणि समजा आपल्या बाईकमधील मीटर जास्त दाखवत असेल तर समजुन घ्यावे की ही बाईक आधी जास्तीत जास्त चालवण्यात आलेली आहे.
  • नवीन बाईक खरेदी करत असताना आपण तिची बँटरी देखील चेक करून घ्यायला हवी याने आपल्याला लक्षात येते की त्यात नवीन बँटरी टाकली आहे की जुनी
  • नवीन बाईक खरेदी करत असताना आपण हे देखील चेक करायला हवे की त्या बाईकमध्ये नट वगैरे व्यवस्थित फीट केले आहे का.कारण कधी कधी काही बाईकमध्ये नट व्यवस्थित फीट केलेले नसतात.
  • कधीही बाईक खरेदी करत असताना आपण प्राँपर मार्केट रिसर्च करून आपल्याला हवी तशी बाईक आधीपासुन निवडुनच शोरूममध्ये बाईक खरेदी करण्यासाठी जायला हवे.कारण कधी कधी आपण फक्त बाईक घ्यायची म्हणुन शोरूममध्ये जात असतो.आणि शोरूमवाले आपल्याला त्यांची एखादी न जास्त न विकली जाणारी बाईक देखील देऊन मोकळे होऊ शकतात म्हणुन आपण आपल्याला कोणती बाईक खरेदी करायची आहे हे आधी ठरवून घ्यावे मगच बाजारात ती खरेदी करण्यास जायला हवे.