कडूनिंब पिकांवरील किडींचे व्यवस्थापन-  Uses of Neem for crop protection and Pest management

कडूनिंब पिकांवरील किडींन-  Uses of Neem for crop protection and Pest management

कीटकनाशकांमुळे सतत दिसून येणारे दुष्परिणाम व त्यांच्या वाढत्या किमती इत्यादींचा विचार केल्यास वनस्पतिजन्य कीटकानाशकांना महत्त्व देणें गरजेंचे ठरते. वनस्पतिजन्य  कीटकनाशकांमध्ये अनेक महत्त्वाच्या वनस्पतींचा समावेश होतों.

त्यातूनच कडूनिंब या वनस्पतीला त्याच्या उपयुक्त औषधी गुणधर्मामुळे वेगवेगळ्या पिकांवरील किडींचे व्यवस्थापन करता येतें. कडूनिंबाच्या वनस्पतीपासून बरीचशी व्यापारी कीटकनाशके विकसित करण्यात आलेली आहेत.

कडूनिंबातील संयुगे :

  • उदा अंझाडिरॅक्‍्टीन, सलानिन, मेलिनट्रायळ व निंबीन इ. हें नैसर्गिक उत्पादन असलेली लिमोनांड या गटात मोडतात, ज्याचा वापर कीड नियंत्रणात प्रामुख्याने केला जातो.
  • लिमोनॉड हा गट कडूनिंबाला अधिक प्रभावी व कार्यक्षम कीटकनाशक, कृमिनाशक, बुरशीनाशक इ. बनवतो. अंझाडिरक्टीन हा संयुग कडूनिंबाचा क्रियाशील घटक म्हणून ओळखला जातों.
  • कडूनिंबाच्या निंबोळींमध्ये महत्तम कीटकनाशकीय गुणधर्म आहेत. कीटकनाशकाचा मुख्य स्रोंत म्हणजे निंबोळ्यांतील बियाणे आहेत.
  • एका पूर्ण वाढ झालेल्या झाडापासून जास्तीत जास्त ५० ते १०० किलोंपर्यंत ताज्या निंबोळी मिळतात. ५० किलो ताज्या निंबोळ्यांपासून ३० किलो बियाणे मिळते व त्यापासून ५ किलो तेल आणि २५ किलो ढेप मिळते.
  • कडूनिंबापासून तयार केलेल्याकीटकनाशकाचा वापर करून पिकांवरील किडींवर फवारणी केल्यास कीटकांच्या वागणुकीमध्ये बदल होऊन त्यांच्या शरीरक्रियांमध्ये घातक बदल होतात व शेवटी ते मरतात.

कडूनिंबातील सक्रिय घटक :

१. भुकटी : सूर्यप्रकाशात कडूनिंबाची पाने, बियाणे, दाणे वाळवून त्यांची मुकटी करून १-२ टक्के या प्रमाणात साठवणुकीच्या धान्यात मिसळतात. यामुळे धान्य किडींपासून सुरब्षित ठेवण्यास मदत होते.

२. मलम : निंबोळीच्या दाण्यापासून चरबी विरहित मुकटी तयार करून पाण्याद्वारे फवारणी करता येते.

३. निमतेल : निमतेल्ात 0.३ ख्के अंझाडिरॅक्‍्टीन व इतर घटक असून तें अनेंक प्रकारच्या किडींपासून पिकांचे सरक्षण करण्याकरिता वापरता येतें.

See also  जीवनातील यशाचं रहस्य - Earl Nightingale - Strangest secret Summary in Marathi

४. निम अर्क : पानें बियाणे, दाणे, साल इ.पासून पाण्यातील अर्क काढतात किंवा सेंद्रिय द्रावके इथिल अल्कोहोल, बेन्झीन, अँसीटोन यामध्ये अर्क काढून त्याचा पाण्यातील ५ ते १० टक्के तीव्रतेचा फवारा

कडूनिंबामधील घटकांचे किडीवर

Uses of Neem for crop protection and Pest management

होणारे परिणाम :

१. किडीमध्ये नपुसकता येतें.

२. फवारणी केलेल्या पिकावर किडीच्या माद्या परावर्तित होतात व अंडी घालणे टाळतात.

३. किडीची वाढ खुंटते व अपंगत्व येते.

४. अंडी घालण्याची/उबवण्याची क्षमता कमी होते व आयुष्य कमी होते.

५. फवारणी केलेल्या झाडावर किडी भक्षण करू शकत नाहीत.

निमयुक्‍त कीटकनाशके आर्थिकदृष्ट्या किफायती पर्यावरणमित्र,सुरक्षित आणि कीटकांना हमखास नुकसान करणारी आहेत. फवारणी केलेल्या झाडावर व होणाऱ्या उत्पादनामध्ये हानिकारक अवशेष आढळत नाही. म्हणूनच त्यांना एकात्मिक कीड व्यवस्थापनात महत्त्वाचे स्थान आहे.

कंपन्यांनी उत्पादित केलेली निमयुकक्‍त कीटकनाशकांसारखीचपरिणामकास्कता शेतकऱ्यांनी स्वत:च तयार केलेल्या निंबोळी अर्कमध्येसुद्धा दिसून आलेली आहे.

निंबोळी अर्क तयार करण्याची सोपी पद्धत पुढीलप्रमाणे आहे :

१. निंबोळ्या उपलब्ध असताना त्या जमा करून चांगल्या वाळवा व साठवून ठेवा.

२. फवारणीच्या आदल्या दिवशी आवश्यक तितक्‍या निंबोळ्या (५ कि/ १000 लिटर द्रावणाकरिता या प्रमाणात) कुटून बारीक करा.

३. पाच किलो निंबोळीचा चुरा ६ लिटर पाण्यात फवारणीच्या आधीच्या दिवशी सायंकाळी भिजत टाका. तसेंच, एक लिटर पाण्यात २०० ग्रॅम साबणाचा चुरा भिजत टाका.

४. दुसऱ्या दिवशी सकाळी निंबोळीचा अर्क फडक्यात चांगला गाळून घ्या. या अर्कात एकूण १० लिटर होईल एवढे पाणी मिसळा व १०

लिटर पाण्यात १ लिटर अर्क घेऊन फवारणी करावी.

अशा प्रकारे ५ टक्के निंबोळीचा अर्क फवारणीच्या दिवशीच तयार करून वापरा. तयार केलेला अर्क साठवून ठेवता येत नाही.

या अर्काच्या फवारणीमुळे कपाशीवर बोंडअळ्यांचे, हरभऱ्यावरील घाटेअळीचे, तुरीवरील शेंगा पोखरणाऱ्या अळ्यांचे नियंत्रण करणें सोपे होते. तसेच, परोपजीवी कीटकांना अभय मिळते.

या अर्कासोबत मोनोक्रोटोफॉसची अर्धी मात्रा टाकल्यास (७ मि.लि. किंवा ५ मि.लि. प्रति १० लिटर पाण्यात) ते जास्त प्रमावी ठरते आणि पिकांवरील इतर किडींचेसुद्धा नियंत्रण करता येते.

See also  बार अणि बेन्च म्हणजे काय? अर्थ व त्यातील फरक - Bar and Bench in Marathi