जुने कागदोपत्री शेअर सर्टिफिकेट डिमॅट अकाऊंट ला हस्तांतर कसे करावे (Share Dematerialization Process in Marathi) ? How to transfer physical share certificate

जुने शेअर सर्टिफिकेट डिमॅट अकाऊंट ला हस्तांतर कसे करावे – Share Dematerialization Process in Marathi

शेअर मार्केट संबधीत गुंतवणूकधारनां माहीत असेल की आपण जे शेअर विकत घेतो ते आपल्या डिमॅट अकाऊंटला जमा झालेले असतात ,म्हणजे आपले शेअर हे  demat mode मध्ये आहेत  असं म्हटलं जाते. 

आजच्या टेक्नॉलॉजीज्या जगात शेअर बाजारात सूची बद्दल झालेल्या कंपनी चे शेअर Demat mode मध्ये आता CDSL किंवा NSDL च्या देखरेखीखाली खाली सांभाळले जातात. 

परंतु जर आपल्या कडे कागदोपत्री पत्री समभाग प्रमाणपत्र (Old physical share certificate) असतील तर ? आपल्या वडिलांकडे किंवा ,आजोबा ,आजी यांचे नावे आजकाल बऱ्याच जणांकडे जुन्या रेकॉर्ड मध्ये असे शेअर आढळून येत आहेत आणि अश्या शेअर्सला आपल्या नांवे कसे करावे याबाबत नेमकं माहीत  नाहीय ,याची  नावे करण्याची प्रक्रिया काय आहे ? 

खाली दिलेली पावलं उचलून , स्टेप बाय स्टेप  प्रक्रिया करून आपण हे शेअर्स आपल्या नावे Demat mode मध्ये ट्रान्स्फर करून करू शकता.

 1. सर्वात प्रथम ज्या कंपनीचे शेअर्स आहेत ती कंपनी अजून ही शेअर बाजारात लिस्टमध्ये आहे का पाहावे. NSE व BSE या दोन्ही स्टॉक एक्स्चेंज मध्ये चेक करा. नाव असेल तर तर तिथे नक्की सापडेल. 
 1. नसेल तर मग कंपनीच नाव तर बदल झाले नसेल हे चेक करा.  आपण पुन्हा हे NSDL , CDLS साइट्स वर चेक करू शकाल.
 1. जुने सापडलेल शेअर्स जर एकाच व्यक्तीच्या नावे असतील आणि शेअर धारक हयात असतील तर त्यांच्या नावे Demat Account ओपन करावं. 
 1. त्यांनतर एकदा आपलं डिमॅट अकाऊंट ओपन झालं की , आपल्याकडे असलेलं समभाग प्रमाणपत्र(transfer  Old physical share certificate)  हे  Demat Requisition form (DRF)  व आपल्या ओळखपत्रा सहित आपण ज्या ब्रोकर कडे Demat  account open केले आहे त्यांच्या कडे पाठवावेत. बस,, त्यानंतर आपले ब्रोकर पुढची सर्व सोपस्कार , प्रकिया पार पाडून शेअर्स आपल्या नावे करतील.
 1. ही संपूर्ण Demat mode  मध्ये शेअर्स ट्रान्सफर होण्याची प्रक्रिया साधरण 25-30 दिवसात पूर्ण होते.
 1. आता जर शेअर्स हे जर जॉईंट नावे असतील (संयुक्त खाते – पती, पत्नी) , ,आणी दोन्ही जण हयात असतील  तर demat account ओपन करावे. कारण जे शेअर्स जॉईंट नावे असतात ते  सिंगल  नांवे असणाऱ्या demat account ला नियमाने ट्रान्फर करता येत नाहीत. त्या करता join account ओपन करण गरजेचं आहे ये लक्ष्यात असू द्या.
 1. पण दुर्दवाने शेअर्स होल्डर मयत असतील तर काय करावे? अश्या स्तिथीत    आपल्याला कंपनी रजिस्ट्रार व ट्रान्स्फर एजेंट कडे संपर्क करावा लागेल.  RTA यांच्याकडे कंपनी च्या समभाग चा संपूर्ण data, माहिती असते.
 1. इथून आपल्याला माहिती मिळेल की शेअर्स होल्डर नि कुणाला वारस , नॉमिनी नेमले होत का.जर वारस नेमले असेल तर आपली वारस म्हणून ओळख पत्र सादर करून , तसेच आपल्याकडील शेअर सर्टिफिकेट सादर करून , शेअर्स आपल्याला आपल्या नावे म्हणजे वारसाच्या च्या नावे हस्तांतर करता येतात.
 1. एकदा ,वारसांच्या नावे शेअर सर्टिफिकेट हस्तांतर झाले की वर सांगितल्याप्रमाणे demat account open  करून प्रक्रिया demat mode मध्ये पूर्ण करावी.
 1. आता जर वारस नेमला नसेल तर काय करावे? – तर RTA कडे आपल्याला आपण कायदेशीर वारस आहात म्हणून कायदेशीर ओळखपत्रे देऊन सिद्ध करावे लागेलकी आपण वारस आहात . त्यानंतर  RTA कागदपत्रे पडताळणी करून  कागदोपत्री असलेले शेअर्स वारसांच्या नांवे हस्तांतर करतील. 
 1. आता वारसांना कागदोपत्री असलेले शेअर्स मिळाले की (सहसा याला 15-20दिवस लागतात त्या करता आपल्या ला सतत पाठपुरावा करावा लागेल) त्यानंतर पुन्हा वर सांगितलेल्या प्रमाणे demat account ओपन करून प्रक्रिया पूर्ण करावी.
 1. जर शेअर्स जॉईंट नावे (संयुक्त खाते – पती, पत्नी)  असतील आणि आणि दुर्दवाने एक जण त्यातला मयत असेल तर,  हयात असलेल्या सदस्य च्या नावे  demat account ओपन करावे आणि ब्रोकर शी संपर्क करून सर्व संबंधित कागदोपत्र  त्यांच्याकडे सुपूर्द करावीत.
 1. त्या सोबतच ट्रान्समिश अर्ज आणि दुसर्‍या शेअर होल्डर च्यामृत्य संबंधित कागदपत्रे सुद्धा पाठवावीत.. ब्रोकर ही कागदपत्रे RTA कडे पाठवेल. कागदपत्रे तपासून प्रक्रिया पूर्ण करून  शेअर्स  हयात असलेल्या  सदस्या च्या demat account ला शेअर्स च  हस्तांतर होईल
See also  युपीआय पेमेंटच्या मर्यादेत आरबीआयने वाढवली मर्यादा - UPI Lite Transaction Limits increased

अश्या प्रकारे  वरील दिलेल्या माहितीच्या आधारे जुने शेअर असतील तर प्रक्रिया पूर्ण करून  demat mode मध्ये शेअर सहजरित्या हस्तांतर करू शकाल.

टीप – जर आपल्याला घरात सापडलेले  शेअर्स सर्टिफिकेट कोणत्या कंपनीचे आहे हेही  माहीत नसेल तर चिंता न करता कोणत्या ही SEBI रजिस्टर ब्रोकर(झेरोधा), एजेंल ब्रोकर, ) कडे संपर्क करावा. काय सांगाव हे सापडलेले शेअर्स ची किंमत आज लाखो रुपये असेल.

3 thoughts on “जुने कागदोपत्री शेअर सर्टिफिकेट डिमॅट अकाऊंट ला हस्तांतर कसे करावे (Share Dematerialization Process in Marathi) ? How to transfer physical share certificate”

 1. आपल्याकडे असलेले जुने शेअर सर्टिफिकेट्स 100 एसबीआय चे शेअर असले तर त्याची आता एकूण व्हॅल्यू किती झाली असेल. हे कसे शोधावे . कृपया मार्गदर्शन करावे ..9422381888

Comments are closed.