Web 3.0 म्हणजे काय ? Web3 Next generation internet Marathi information

Web 3.0 संपूर्ण माहिती ? Web3 Next generation internet Marathi information

वेब ३ ही इंटरनेटची पुढची पाऊल असणार आहेत. या तंत्रावर सध्या जोरदार संशोधन सुरू आहे

वेब ३.० ही इंटरनेट सेवांची तिसरी पिढी आहे जिचा वेबसाईट्स आणि एप्लीकेशन्स करता उपयोग केला जाणार आहे , यात इंटरनेट सुविधा देण्या साठी मशीन आधारित संग्रहीत महितीचा उपयोग करून वेब सेवा प्रदान करण्यात येणार आहे . वेब ३.० च मुख्य लक्ष्य व ध्येय हे अधिक बुद्धिमान, सहज जोडल्या जाणार्‍या आणि सर्वांसाठी खुल्या अश्या वेबसाइट तयार करणे हे आहे. परंतु वेब ३.० ची अद्याप अंमलबजावणी झालेली नसलयाने , परिपूर्ण अशी व्याख्या आज सांगता येणार नाही.

आज इंटरनेटवर अनेक अँप्स तसेच साँप्टवेअर डेव्हलप केल्या जातात.त्या अँपमध्ये मग जसजसे नवीन फिचर्स अँड केले जातात तसे त्या अँपचे व्हर्झन बदलत असतात.

म्हणजे समजा सँमसंग नावाची एक अँप आहे जिचे एक अजुन जास्त फिचर असलेले नवीन व्हर्झन तयार करण्यात आले तर मग त्या पहिल्या व्हर्झनला सँमसंग 1,0 त्यानंतरच्या आलेल्या व्हर्झनला 2,0 आणि मग त्यानंतरही अजुन लेटेस्ट फिचर अँड करून तयार केल्या गेलेल्या अँपला सँमसंग 3,0 असे नाव दिले जात असते.

एकदम त्याचप्रमाणे वेब 3.0 हे देखील एक नवीन व्हर्झन आहे जे वेब 1.0 आणि वेब 2.0 नंतर आले आहे.वेब 1.0 आणि 2.0 मध्ये काही त्रुटी आढळुन आल्या होत्या ज्या भरून काढण्यासाठी वेब 3.0 हे लाँच करण्यात आले होते.

आजच्या लेखात आपण ह्याच वेब 1.0,2.0 आणि 3.0 ह्या तिन्ही व्हरझन विषयी सविस्तरपणे माहीती जाणुन घेणार आहोत.

Web 1.0 काय होते? Web3 Next generation internet Marathi information

वेब 1.0 ह्या वेबसाईटच्या पहिल्या version मध्ये वेबसाईटवर फक्त जो मेन वेबसाईटचा ओनर असायचा त्याला पोस्ट टाकता यायच्या आणि बाकीच्या युझर्सला त्या वेबसाईट ओनरने टाकलेल्या सर्व पोस्ट फक्त वाचता येत होत्या.त्यावर कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त करता येत नव्हती.

See also  आदित्य मिशन कधी लाँच करण्यात येईल ? किती दिवसांचे आहे? किती खर्च ? Aditya-L1 mission

म्हणजेच वेब 1.0 हे एक फक्त एक read only वेब होते.जिथे फक्त वेबसाईटच्या ओनरला लिहिण्याची परमिशन असायची बाकीचे त्या पोस्टला फक्त रीड करू शकत होते.

Web 2.0 काय होते?

वेब 1.0 हे एक फक्त एक read only वेब होते.जिथे फक्त वेबसाईटच्या ओनरला लिहिण्याची परमिशन असायची बाकीचे त्या पोस्टला फक्त रीड करू शकत होते.

मग हीच त्रुटी भरूण काढण्यासाठी वेबसाईटचे एक नवीन व्हर्झन तयार करण्यात आले होते ज्याचे नाव वेब 2.0 असे ठेवण्यात आले होते.

हे एक read and write वेब होते ज्यात रीडींगसोबत रायटिंगचे फिचर देखील अँड करण्यात आले होते.इथे सोशल मिडिया एक महत्वाचा भाग बनली ज्यामुळे युझर्सला फक्त रीडींगच करता येत नव्हते तर युझर वेबसाईटवर,अँपवर कमेंट करू लागले टिप्पणी लिहायला लागले आणि ती पोस्ट शेअर आणि लाईक देखील करू लागले.

म्हणजेच यात असे नवीन फिचर टाकण्यात आले ज्यात आपल्याला रीड आणि राईट दोघे करता येईल.याने युझर्सचा परस्परसंवाद होऊ लागला.जग सोशल मिडिया मुळे जवळ येऊ लागले.

पण यात जसा युझर्सचा फायदा होता तसा तोटा देखील होता कारण यात युझर्सचा पर्सनल डेटा त्या अँप तसेच वेबसाईटकडे तसेच इंटरनेट कंपन्यांकडे जाऊ लागला.आणि मग ह्या डेटाचा गैरवापर होण्याची भीती लोकांमध्ये निर्माण होऊ लागली.

म्हणजेच यात यूझर्सच्या डेटा सिक्युरीटीचा प्राँब्लेम निर्माण झाला होता.

तेव्हा ही त्रुटी भरून काढण्यासाठी अजून एक नवीन व्हरझन मार्केटमध्ये लाँच करण्यात आले ज्याचे नाव वेब 3.0 असे ठेवण्यात आले.

Web 3.0 थोडक्यात आहे ?

वेब 3.0 मध्ये इंटरनेटची आपली एक स्वताची मुळ अर्थव्यवस्था असलेली आपणास दिसुन येते.इथे इंटरनेटवरून कोणतीही व्हल्युह प्राप्त करण्यासाठी आपला पर्सनल डेटाचा ताबा कंपन्यांकडे देण्याची जी सक्ती वेब 2.0 मध्ये होती ती संपुष्टात आली.

म्हणजे काय ?

तर सहसा आपन पाहतो की कोणती वेबसाइट किंवा apps तयार केल की te सर्वर based cloud storage वर आपण ते ठेवतो , मात्र web 3 मध्ये तसे न होता हे ब्लॉकचेन किंवा decentralized networks तंत्रा वर आधारित असेल.

See also  Google word coach विषयी माहीती - Google word coach Marathi information

इथे आपल्याला आपल्या डेटाची मालकी देण्यात आली.इथे युझर्सच्या पर्सनल डेटाचा वापर करण्याची परमिशन कोणत्याही कंपनी तसेच थर्ड पार्टीला देणे बंद झाले.

युझर्सच्या डेटाचे काय करावे हे कोणत्याही एका कंपनीकडून जे ठरवले जात होते ते देखील वेब 3.0 मध्ये बंद झालेले आपणास दिसुन येते.

आणि हे 3.0 चे व्हरझन आर्टिफिशल इंटलिजन्सवर आधारलेले आहे.

वेब 3.0 मधील most popular buzzwords कोणकोणते आहेत?

आता आपण वेब 3.0 मधील काही प्रसिदध buzzwords कोणते आहेत हे जाणुन घेऊया.

1)ब्लाँकचेन :

2) क्रिप्टोकरंसी :

1)ब्लाँकचेन : ब्लाँगचेन मध्ये कोणत्याही रेकाँर्ड केलेल्या इनफरमेशनची वैधता ठरवण्यासाठी तसेच सिदध करण्यासाठी आपणास केंद्रिय प्राधीकरणाची नड भासत नसते.

म्हणजे समजा आपण आपल्या मित्राला पैसे पाठविले तर ते पैसे त्याला सेंड होऊन त्याच्या हातात गेले आहे की नाही हे सिदध करण्यासाठी आपल्याला कुठल्याही बँकेची गरज पडत नसते.कारण इथे रिअल टाईममध्ये पाहण्याची सुविधा आपल्याला प्राप्त असते.

2) क्रिप्टोकरंसी :

सध्या आपल्याला आपले पैसे काढण्यासाठी तसेच पाठविण्यासाठी पे पाल सारख्या बँकिंग अँप्सवर निर्धारीत राहावे लागत असते.

आणि ह्या बँकिंग अँप्सच्या ट्रान्झँक्शन प्रोसेसला वेळही लागत असतो.आणि ह्या फार खर्चिक देखील असतात.

ब्लाँकचेनवर आधारलेली किप्टोकरंसी ह्या मध्यस्थींना काढुन टाकत असते.

Web 3.0 चे कोणकोणते फायदे आहेत?

वेब 3.0 चे अनेक फायदे असतात आणि ते पुढीलप्रमाणे आहेत :

1) डेटा सिमेंटीक :

वेब 3.0 मध्ये आपला सर्व डेटा सिमेंटिक म्हणजेच अर्थपुर्ण राहत असतो जी सुविधा 2,0 मध्ये नव्हते तिथे आपल्याला किवर्डवर अवलंबुन राहावे लागायचे.आपळल इंटेंट वर भर देण्यात येणार आहे

2) डेटा प्रायव्हेसी :

इथे आपल्याला आपल्या डेटाची प्रायव्हेसी देखील मिळत असते.कारण इथे आपल्या डेटाचे स्टोरेज हे कोणत्याही एका कंप्युटर तसेच सर्वरवर केले जात नसते.याने कोणीही आपला डेटा प्राप्त करू शकत नाही.

3) डेटा सिक्युरीटी :

See also  फ्री डेटा रिकव्हरी साँफ्टवेअर माहिती - Top 6 Best And Free Data Recovery Software 

इथे आपला सर्व डेटा देखील सिक्युअर राहत असतो कारण आपला डेटा एकाच ठिकाणी स्टोअर न राहता विविध ठिकाणी स्टोअर केला जातो ज्याने आपला डेटा हँकर्सला हँक करायला अजिबात शक्य होत नसते.कारण त्याला सर्व सर्वरचा डेटा एकाचवेळी हँक करणे शक्य नसते.

4) सर्वरलेस होस्टिंग :

इथे आपला डेटा एकाच सर्वर वर स्टोअर केला जात नसल्यामुळे आपल्याला होस्टिंगची देखील आवश्यकता भासत नसते.

Web 3.0 विषयी वारंवार विचारले जाणारे महत्वाचे प्रश्न

1)वेब 3.0 चे मुख्य वैशिष्टय काय आहे?

वेब 3.0 चे मुख वैशिष्टय हे आहे की इथे आपल्या डेटाची सिक्युरीटी प्राप्त होत असते,डेटाची प्रायव्हेसी देखील मिळत असते.आणि सगळयात महत्वाचे म्हणजे ब्लाँकचेन टेक्नाँलाँजीचा यात वापर करण्यात आला आहे आणि यात आपल्याला होस्टिंगची देखील गरज पडत नसते.

2) वेब 3.0 चे दुसरे नाव कोणते आहे?

वेब 3.0 ला आपण वेब 3.0 सोबत डिसेंट्रलाईज्ड वेब,सिमेंटिक वेब असे देखील म्हणत असतो.

3) वेब 3.0 किती महत्वपुर्ण आहे का?

होय नक्कीच कारण इथे आपला डेटाचा कंट्रोल मालकी आपल्याकडे राहत असते.आणि त्याची प्रायव्हेसी,सिक्युरीटी देखील आपल्याला दिली जात असते.

म्हणुन वेब 3.0 हे हे भविष्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे आहे.

4) वेब 2.0 ची उदाहरणे कोणकोणती आहेत ?

वेब 2.0 ची अनेक उदाहरणे आहेत जी आपण सांगु शकतो 2.0 मध्ये ब्लाँगर,वर्डप्रेस,टंबलर,विकी पिडिया,वेबली तसेच फेसबुक,इंस्टा,टविटर,युटयुब इत्यादीं सोशल मिडिया नेटवर्क साईटचा समावेश होतो.