Bond म्हणजे काय?what is bond in finance

Bond किंवा कर्जरोखे विषयी माहीती – what is bond in finance

आपल्या दैनंदिन जीवणात फायनान्स तसेच बँकिंग क्षेत्र संबंधीत एक महत्वाचा शब्द आपल्याला नेहमी ऐकायला तसेच वाचायला मिळत असतो.आणि तो शब्द आहे बाँण्ड.

आपण नेहमी खुप जणांच्या तोंडुन ऐकत असतो की कंपनीने माझ्याकडुन इतक्या वर्षाचा करार नामा म्हणजेच बाँण्ड तयार करून घेतला.

तसेच आपण एखादा मोठा पैशांचा व्यवहार करत असतो तेव्हा देखील आपण समोरच्या व्यक्तीने नंतर आपल्या शब्द देऊन बदलु नये म्हणुन त्याच्याकडुन कायदेशीर पदधतीने बाँण्ड करून घेत असतो.

पण हा बाँण्ड म्हणजे नेमकी काय असतो?त्याचे प्रकार कोणकोणते असतात?याचे फायदे कोणकोणते असतात ह्या इत्यादी बाबींबाबत आपण अनभिज्ञ असतो.याची पुर्णता माहीती आपणास नसते.

आजच्या लेखात आपण बाँण्डविषयी संपुर्ण सविस्तरपणे माहीती जाणुन घेणार आहोत.जेणेकरून आपल्या मनात पुन्हा कुठलीही शंका राहणार नाही.

Bond म्हणजे काय?

जेव्हा आपल्याला पैशांची खुप आवश्यकता असते.तेव्हा ती गरज पुर्ण करण्यासाठी आपण पैशांची बचत करत असतो.किंवा एखाद्याकडून उसने पैसे कर्ज म्हणुन घेत असतो.तेव्हा ती पैसे देणारी व्यक्ती आणि आपल्यात एक करार होत असतो.त्या करारालाच बाँण्ड असे म्हटले जाते.

एकदम त्याचप्रमाणे जेव्हा सरकारला वित्तीय तुटीचा फटका बसत असतो.आणि सरकारला काही महत्वाच्या कामांसाठी पैशांची आवश्यकता भासत असते.तेव्हा सरकारकडुन पैसे गोळा करण्यासाठी बाँण्ड जारी केला असतो.

सरकार हे रोखे मोठे इन्व्हेस्टर आणि काँमन इन्वहेस्टरसाठी जारी करत असते.ह्या जारी करण्यात आलेल्या बाँण्डलाच लेटर्स आँफ डेबिट असे म्हटले जाते.कारण हे बाँण्ड पत्राच्या स्वरूपामध्ये असतात.

आणि ह्या पत्रावर रोख्यांची दर्शनी किंमत आणि किंमत देखील लिहिलेली असते.आणि त्यावरील व्याजदर(Interest) देखील लिहिलेला असतो.ज्याला कूपन दर देखील म्हटले जात असते.

बाँण्डचा कालावधी हा एक ते पाच वर्षाचा किंवा दहा तसेच त्याहुनही अधिक कालावधीचा असु शकतो.बाँण्डच्या मँच्युरीटी कालावधीस Maturity Period असे म्हणतात.यात आपणास आपले पैसे विहित अटी नियम आणि शर्तींनुसार परत प्राप्त होत असतात.

थोडक्यात सांगायचे म्हटले तर बाँण्ड हे एक कर्जाचे साधन असते.ज्यादवारे विविध काँर्पारेटस तसेच सरकार सारख्या इतर संस्थांना बाजारातुन निधी उभारता येत असतो.

आणि ह्या गोळा केलेल्या निधीचा वापर काँपारेट तसेच संस्थेकडुन आपल्या उद्योग व्यवसायाच्या विस्तारासाठी केला जात असतो.

बाँण्डदवारे वित्तीय संस्था बाँण्ड जारीकर्त्याला कर्ज प्रदान करत असतात.आणि बाँण्ड जारी कर्ता ज्याच्याकडून त्याने पैसे घेतलेले आहेत त्या व्यक्ती तसेच वित्तीय संस्थेच्या नावाने बाँण्ड जारी करत असतो.आणि त्या बदल्यात तो निश्चित व्याजदर देण्याचे आश्वासन देखील देत असतो.

See also  फस्ट पार्टी,सेकंड पार्टी अणि थर्ड पार्टी इंशुरन्स म्हणजे काय?First party insurance,second party insurance and third party insurance

Bond चे प्रकार किती आणि कोणकोणते आहेत?

Bond चे पुढील काही प्रकार आहेत –

1) Secured Bond :

Secure बाँड हा बाँण्डचा असा प्रकार आहे ज्यात आपले पैसे नेहमी सुरक्षित राहत असतात.

यात जर आपण आपले पैसे एखाद्या कंपनीच्या बाँडवर गुंतवले असतील आणि ती कंपनी सतत लाँसमध्ये जात असेल,तर अशा परिस्थितीत सुदधा आपल्याला आपले पैसे फक्त ठरल्यानुसारच मिळत असतात.

2) Insecure Bond : Insecure Bond हे फार जोखिमदायक असतात.

कारण यामध्ये आपण ज्या कंपनीच्या बाँण्डवर आपले पैसे गुंतवलेले असतील आणि त्या कंपनीला मोठा तोटा झाला किंवा नफा झाला तरी देखील ती कंपनी आपले पैसे वापस करत नसेल तर अशा परिस्थितीत आपण त्या कंपनीवर कुठलीही कारवाई करू शकत नसतो.

अशा बाँण्डवरील अटी आणि शर्ती अतिशय प्रभावकारक असतात.आणि यावरील व्याजदर देखील फार जास्त असते.

3) Zero Coupon Bond :

झिरो कुपन बाँण्डमध्ये कंपनी आपणास कुठलेही व्याज देत नसते.यामध्ये आपल्याला प्राँफिट वेगळया पदधतीने दिला जात असतो.

जर एखाद्या कंपनीच्या बाँडची PRICE VALLUE 1000 असेल आणि ते शून्य कूपन बाँड असेल,तर आपण तो बॉण्ड 900 रुपयांना खरेदी करू शकतो.

4) Government Bond :

ज्यावेळेस सरकारला सरकारी कामकाजासाठी भांडवलाची आवश्यकता असते तेव्हा सरकार रोखे जाहीर करत असते.या बाँण्डलाच डिबेंचर असे देखील म्हणतात.

आणि हा सरकारी रोख्यामधुन जमा झालेला सर्व पैसा सरकारी योजनांमध्ये गुंतवला जात असतो.आणि ह्या पैशाची पुर्णत सरकारकडे जबाबदारी असते.

हेच कारण आहे की सरकारी रोखे सुरक्षित मानले जात असतात.सरकारी रोखे खरेदी करण्याकडे लाँग टर्म इन्वहेस्टमेंट म्हणून देखील पाहिले जाते.

5) Municipal Bond :

ज्यावेळेला स्थानिक सरकार,महानगरपालिकेला त्यांचे विविध प्रकल्प जसे की रस्ता बांधणे,शाळा बांधणे,इत्यादीसाठी पैशांची गरज भासत असते तेव्हा अशा वेळेला स्थानिक सरकार देखील बाँण्ड जारी करत असते.अशा रोख्यांना Municipal Bond असे म्हणतात.

हे खुप सिक्युअर असतात आणि यावर इंटरेस्ट देखील चांगला मिळत असतो.

6) Corporate Bond :

Corporate Bond हे Private Sector कडुन इशु केले जात असतात.कोणत्याही काँर्पारेट सेक्टरला जेव्हा फंडची आवश्यकता असते तेव्हा ते बाँण्ड जारी करत असतात.

काँर्पारेट रोख्यांवर व्याज देखील अधिक असते.यात आपल्याला कंपनीत आपणास शेअर्सप्रमाणे भागभांडवल मिळत नसतो.ठरलेल्या निर्धारीत वेळेमध्येच व्याजासकट पैसे आपल्याला दिले जात असतात.

7) Perpetual Bond :

ह्या बाँण्डमध्ये जास्त अटी नसतात.हे आपण लाँग टर्मसाठी किंवा शाँर्ट टर्मसाठी देखील ठेवू शकतो.यातील व्याजदर देखील खुप चांगले असते.

यात खरेदी केलेल्या बाँण्डमधून आपणास कंपनीमध्ये स्टेक मिळत असतो.हे स्टाँक आणि इक्विटी सारखेच असते.म्हणजे यात आपण जितके रोखे विकत घेत असतो तेवढ्या टक्कयाची आपली त्या कंपनीवर मालकी राहत असते.

8) Inflation Bond :

चलन वाढ रोख्यांमध्ये रोख्यांचा व्याजदर हा महागाईच्या हालचालींवर पुर्णपणे डिपेंड असतो.यात आपल्या बाँण्डवरचे व्याजदर हे महागाईनुसार वाढत तसेच कमी देखील होत असतात.

See also  भारतातील बॅका देखील अमेरिकन‌ बॅका प्रमाणे आर्थिक संकटात आल्या तर भारतातील बॅक ठेवीदारांच्या पैशाचे काय होईल? - bank bankruptcy crisis

9) Callable Bond :

जर कंपनीला दिलेल्या वेळेपूर्वी आपल्या दवारे जारी केलेले रोखे परत विकत घ्यायचे असतील,तर कंपनी ते कॉल करण्यायोग्य Callable Bond अंतर्गत असे करू शकते.

जर कंपनीला कमी वेळात चांगला नफा मिळत असेल आणि घेतलेले कर्ज लवकर परत मिळावे असे तिला वाटत असेल तर ती असे करू शकते.

या परिस्थितीत,आपणास कंपनीला बाँड परत करावा लागतो आपण असे करण्यास नकार देऊ शकत नाही.

10) Convertible Bond :

या बाँण्डमध्ये जर आपल्याला एखाद्या कंपनीत हिस्सा घ्यायचा असेल तर म्हणजेच त्या कंपनीचा शेअर होल्डर बनायचे असेल आपण बाँण्डला स्टाँक मध्ये कन्वहर्ट करू शकतो.

यात आपल्याकडे कंपनीचे काही बाँड असतील तर त्याना शेअर्समध्ये रूपांतरीत करून आपण त्या कंपनीचे शेअर होल्डर बनू शकतो.

बाँण्ड हा एक लाँग टर्म इन्वहेस्टमेंटचा एक उत्तम मार्ग आहे.जर आपल्याला बाँण्डमध्ये इन्वहेस्टमेंट करायची असेल तर आपण आधी संशोधन करायला हवे त्यानंतर आपण न घाबरता बाँण्डमध्ये इन्वहेस्टमेंट करू शकतो.

Bond कशापदधतीने कार्य करत असतात?

जेव्हा एखाद्या कंपनीला किंवा इतर कुठल्याही संस्थेला नवीन प्रोजेक्टसाठी वित्त पुरवठा करायला,चालू कामकाजाची देखरेख करायला,विद्यमान कर्ज पुनर्वित करायला पैसे उभारण्याची गरज असते.तेव्हा ती कंपनी तसेच संस्था इन्वहेस्टर्ससाठी बाँण्ड जारी करत असते.

कर्ज घेणारा व्यक्ती यात एक बाँण्ड जारी करत असतो.ज्यात कर्ज घेण्याची अट,द्यायचे व्याज,कर्जाचा निधी रक्कम,घेतलेले कर्ज परत करायचा कालावधी,परिपक्वता(Maturity Date) डेट देखील दिलेली असते.

व्याज भरणा हा परताव्याचा एक भाग असतो जो बाँडधारकास त्याने दिलेल्या कर्जाच्या मोबदल्यात दिला जात असतो.

बहुतेक बाँण्डची आरंभीची प्राईज जनरली बरोबरीने सेट केली जात असते.जनरली 100 किंवा 1000 इतकी Face Value प्रत्येक बाँण्डची असते.

बाँडचे रिअल मार्केट प्राईज अनेक घटकांवर डिपेंडंट असते.बाँड जारी करणारयाची क्रेडिट काँलिटी,कालबाह्य होण्यापर्यतचा कालावधी तसेच वेळ,त्या वेळेस सुरू असलेला काँमन इंटरेस्ट रेट.बाँण्डचे अंकित मुल्य(बाँण्ड मँच्युअर झाल्यानंतर कर्जदारास जी रक्कम परत दिली जाते).

Bond चे फायदे कोणकोणते असतात?

Bond चे फायदे पुढीलप्रमाणे असतात-

1)Stability :

Bond हे एक Longterm Investment चे साधन आहे.आणि हे आपणास Investment Options च्या तुलनेत खात्रीशीर Returns देखील देते.

हे इन्वहेस्टर्सला इक्विटीच्या Unstable Returns च्या तुलनेत कमी रिस्कचे मार्ग प्रदान करत असतात.जरी इक्विटीमधले Profit उन्पन्न,Coupon Returns पेक्षा जास्त आहे तरी देखील चक्रिय बाजारामधल्या चढ उतारांच्या तुलनेमध्ये बाँण्ड हे अधिक Stable असतात.

2) Indenture :

Bond हे आपणास Legally म्हणजेच कायदेशीर हमी देत असतात कारण यात कर्ज घेत असलेल्या व्यक्तीला मुददल रक्कम देणे बंधनकारक असते.

बाँण्ड हे आर्थिक करार (Economical Agreement) म्हणून देखील कार्य करीत असतात.ज्यात सममुल्य,कुपन रेट,कालावधी,क्रेडिट रेटिंग सारखे महत्वाचे तपशील दिलेले असतात.

See also  म्युच्युअल फंड नॉमिनीची अंतिम तारीख वाढवली - Mutual fund nominee last date extended

3) Portfoliow Diversification :

Investor आपल्या Investment Portfoliow मध्ये विविधता(Diversification) आणण्यासाठी बाँण्डसारख्या फिक्स इन्कम डेब्ट इंस्ट्रुमेंटवर गुंतवणुक करण्यात अधिक डिपेंडंट असतात.

कारण बाँण्ड हे आपल्याला Investment वर High Risk Well Adjusted Returns देत असतात.

याने पोर्टफोलिओ डायव्हरसिफिकेशनसाठी फक्त इक्विटीवर डिपेंडंट न राहता फिक्स इन्कम इंस्ट्रुमेंट इन्वहेस्टमेंट फंडची वाटणी करून आपल्याला शाँर्ट टर्म लाँस होण्याची संभावना कमी करता येत असते.

Bond चे Limitations कोणकोणते असतात?

Bond च्या पुढीलप्रमाणे काही मर्यादा असतात-

1)Limited Liquidity(मर्यादशील तरलता) :

बाँण्ड हे व्यवहार करण्यासारखे असतात पण यात गुंतवणुक केलेली रक्कम तसेच पैसे काढण्यावर काही निबर्ध असतात.कारण ही एक Longterm Investment असते.

म्हणुन लिक्विडीच्या बाबतीत बाँडच्या अगोदर शेअर्स येत असतात.कारण जर कर्जदाराने त्याची कर्जाची रक्कम काढुन घेण्याचा निर्णय जर घेतला तर बाँडमध्ये
त्याला अनेक फी आणि पेनल्टी लागु होत असतात.

2) Low Returns :

इशुअर बाँण्डवर कुपन रेट देत असतात.जे स्टाँकवरील Return पेक्षा कमी असतात.लो रिस्क इन्वहेस्टमेंट इन्व्हरमेंटमध्ये इन्वहेस्टर्सला इंटरेस्ट म्हणुन सातत्यपुर्ण पदधतीने रक्कम मिळत असते.

तसेच यात इतर Debt Instrument च्या तुलनेत Returns फार कमी प्राप्त होत असतात.

3) Inflation Influence :

जेव्हा इशुअरने इशु केलेल्या कुपन रेटपेक्षा इन्फ्लेशन रेट जास्त असतो.अशा परिस्थितीत बाँण्ड इनफ्लेशन रिस्कसाठी Sensitive असतात.

गुंतवणुक केल्या असलेल्या मुख्य किंमतीवर Inflation Influence मुळे Devaluation चा धोका देखील असतो.

Bond ची वैशिष्टये कोणकोणती असतात?

बाँण्डची वैशिष्टये पुढीलप्रमाणे आहेत:

1)Face Value :

एखाद्या कंपनीकडुन जारी करण्यात आलेल्या बाँण्डच्या एका युनिटचे मुल्य.

ठरलेल्या कालावधीनंतर इन्वहेस्टर्सला ही किंमत परत करणे बाँण्ड जारी कर्त्याला कायदेशीररीत्या बंधनकारक आहे.

2) Interest आणि Coupon Rate :

बाँण्डस आपल्या कार्यकाळामध्ये Fix तसेच Variable Interest Rate जमा करत असतात.जे इन्वहेस्टरला Payable असतात.बाँण्डच्या इंटरेस्ट रेटलाच कुपन रेट देखील म्हटले जाते.

3) Credit Quality :

बाँण्डची क्रेडिट काँलिटी कंपनीच्या प्राँपर्टीच्या Long Term Performance वर Depend असते.

क्रेडिट रेटिंग एजन्सी ह्या कर्जाची परतफेड करत असताना कंपनीच्या रिस्कवर आधारीत बाँण्डसचे वर्गीकरण करत असतात.

क्रेडिट रेटिंग एजन्सी बाजारातील कंपन्यांच्या बाँण्डचे तीन भागात वर्गीकरण करत असतात.

1)Investment Grade

2) Non Investment Grade

3) Debt Instrument

Low Risk ह्या घटकामुळे Investment Grade Securities कमी उत्पन्नासाठी Sensitive असतात.आणि Non Investment Grade Securities High रिस्कवर High Return देत असतात.

Bond मध्ये गुंतवणुक करण्याआधी आपण कोणत्या गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात?

Bond मध्ये गुंतवणुक करण्याआधी आपण पुढील गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात:

1) Investment Aim –

Investors ने Face Value,Coupon Rate,Bond Period नुसार त्याच्या गुंतवणुकीवरील Returns च्या अपेक्षा ठरवायला हव्यात.

2) Analyzing Risk Capicity –

मार्केटमधील सर्वोतम बाँण्ड प्राप्त करण्यासाठी गुंतवणुकदारांनी कंपनीच्या क्रेडिट रेटिंगचे विश्लेषण करायला हवे.

High Returns देणारया बाँण्डचे High Risk घटकांसोबत क्रेडिट रेटिंग एजन्सीच्याकडुन वर्गीकरण केले जात असते.

थोडक्यात बाँण्डची निवड ही गुंतवणुकदार किती रिस्क घेऊ शकतो ह्या त्याच्या रिस्क घेण्याच्या क्षमतेवर अवलंबून असते.

1 thought on “Bond म्हणजे काय?what is bond in finance”

Comments are closed.