Internet वापरातील नेहमी येणारे कॉमन शब्द -common useful internet terms for beginners

Internet वापरातील शब्द – common useful internet terms for beginners

इंटरनेट हे एक असे माहीतीचे भांडार आहे जिथून आपल्याला पाहिजे ती माहीती प्राप्त करता येते.आपल्या दैनंदिन जीवणातील प्रत्येक समस्येवर आपल्याला येथे उपाय मिळत असतात.

इंटरनेट ही एक अशी एकमेव एकमेव जागा आहे जिथे आपल्याला जगातील कोणतीही माहीती मोबाईल,लँपटाँप,कंप्युटरद्वारे डिजीटल स्वरुपात प्राप्त होत असते.म्हणुनच आपण इंटरनेटला संगणकाचे जागतिक नेटवर्क असे संबोधित असतो.आणि वेब सुदधा इंटरनेटचा एक महत्वाचा घटक असतो.

आपल्यातील खुप जण असे आहेत जे इंटरनेटची वाढती ख्याती आणि वाढते डिजीटलायझेशन बघुन  आज इंटरनेट शिकु पाहत आहे.

म्हणुन आपल्या अशाच काही गरजु तरुण मित्र,मैत्रीणींसाठी आणि वडिलधारया लोकांसाठी जे आज आवडीने चाळीशीनंतर देखील इंटरनेट शिकत आहे.इंटरनेटशी संबंधित काही टाँप 20 terms ची सविस्तरपणे माहीती आपण जाणुन घेणार आहोत.जेणेकरून त्यांना इंटरनेटविषयी कोणतीही शंका मनात राहणार नाही.

Beginners साठी top 20 internet terms कोणकोणते आहेत?

Beginners साठी माहिती साठी top 20 internet terms पुढीलप्रमाणे आहेत :

1) ब्राऊझर :BROWSER

2) वेब पेज :WEBPAGE

3) यु आर एल -URL

4) एचटीटीपी  – HTTP

5) एचटीटीपीएस -HTTPS

6)) एचटीएम एल -HTML

7) एक्स एम एल -XML

8) आय पी अँड्रेस -IP ADDRESS

9) आय एसपी  -ISP

10) राऊटर -RAUTER

11) ईमेल -EMAIL

12) ईमेल स्पँमिंग अँण्ड फिल्टर-EMAIL SPAMING

13) सोशल मिडिया -SOCIAL MEDIA

14) ई काँमर्स -ECOMMERCE

15) इनक्रिप्शन आँथेंटिकेशन – ENCRYPT

16) डाऊनलोडींग -DOWNLOADING

17) क्लाऊड कंप्युटिंग -CLOUD COMPUTING

18) फायरवाँल -FIRWALL

19) मालवेअर -MALWARE

20) ट्रोजन -TROJAN

21) फिशिंंग- FISHING

22) ब्लाँग -BLOG

1) ब्राऊझर : ब्राऊझर हे एक प्रोग्रँमिंग साँपटवेअर तसेच अँप आहे जे आपण निशुल्क वापरत असतो.ज्यावर आपण माहीतीच्या स्वरुपात आँनलाईन कंटेट शोधत असतो.

ब्राऊझर साँप्टवेअर हे एचटीएम एल तसेच एक्स एम एल कोडला ह्युमन रीडेबल फाँरमँटमध्ये कनव्हर्ट करण्यासाठी विशेषकरून वापरले जात असते.

गुगल क्रोम,माँजिला फायरफाँक्स,ओपेरा,इंटरनेट एक्सप्लोअर ही काही अशी ब्राऊझर्सची नावे आहेत जी आपण अधिकतम युझ करत असतो.

2) वेब पेज : आपण इंटरनेटवर सर्च केल्यानंतर वेब ब्राऊझरवर आपल्याला टेक्सट,ईमेज,व्हिडिओ फाँरमँटमध्ये जे रिझल्ट दिसत असतात त्यांना आपण वेब पेजेस असे म्हणत असतो.

3) यु आर एल :युआर एलचा फुलफाँर्म (uniform resource locator असा आहे.यु आर एल हा इंटरनेट पेजेस आणि फाईल्सचा एक युनिक वेब ब्राऊझर अँड्रेस असतो.

See also  इंटरनेट फ्राड आणि फोन स्कॅम पासून स्वतःला सुरक्षित करा - Types of internet fraud and prevention in Marathi

यु आर एल हा पुढीलप्रमाणे असतो -htttp://www.mywebsite.com/my page 

वरील युआर एल आपल्याला लहान देखील बनवता येतो.www.mywebsite.com/my page

युआर एलचे खालीलप्रमाणे तीन प्रमुख भाग असतात :

  • प्रोटोकाँल
  • होस्ट
  • फाईल नेम

4) एचटी टीपी : एचटीटीपीचा फुल फाँर्म (hypertext transfer protocol) असा होतो.एचटीटीपी हे सर्व वेब पेजेसचे डेटा कम्युनिकेशन स्टँडर्ड असते.

जेव्हा वेब ब्राऊझर्समध्ये हा उपसर्ग दिलेला असतो.तेव्हा त्यातील सर्व कंटेट,ईमेज,फोटो,व्हिडिओ वेब ब्राऊझरमध्ये योग्यरीत्या कार्य करीत असतात.

5) एचटीटीपीएस :

एचटीटीपीएसचा अर्थ असा होत असतो की आपले एचटीटीपी हे एकदम सिक्युअर आहे.आपल्या वेब पेजवरील आपली पर्सनल इनफरमेशन तसेच पासवर्ड हाईड करण्यासाठी इनक्रिप्शन करण्यात आले आहे.

म्हणुनच जेव्हा आपण आँनलाईन खरेदी करत असतो तेव्हा तिथे लाँग इन करुन आपल्या क्रेडिट कार्डची माहीती तिथे भरण्यापुर्वी आपण त्या साईटच्या युआर एलमध्ये एचटीटीपीएस आहे की नाही हे बघायला हवे असते.

6)  एचटी एमएल :

 एचटी एम एलचा फुल फाँर्म (hypertext markup language) असा होत असतो.

एचटी एम एल ही वेब पेजेसची एक कोडिंग तसेच प्रोग्ँमिंग लँग्वेज असते.एचटीएम एल हे वेब ब्राऊझरला टेक्सट आणि ग्राफिक डिस्प्ले करण्यासाठी कमांड देण्याचे काम करत असते.

7) एक्स एम एल :

 एक्स एम एलचा फुल फाँर्म(extended mark up language) असा आहे.

एक्स एम एल हे वेब पेजेसच्या टेक्सट कंटेटच्या कँटलाँग आणि डेटाबेसवर लक्ष ठेवण्याचे काम करते.

8) आयपी अँड्रेस :

आपल्या कंप्युटर मोबाईल तसेच इंटरनेटशी कनेक्ट होत असलेल्या डिव्हाईसला आयडेंटीफाय करण्यासाठी त्याच्या इंटरनेट प्रोटोकाँलचा अँड्रेस जाणुन घेण्यासाठी

 किंवा तो व्यक्ती तसेच इंटरनेट युझर कोणत्या लोकेशनवरून इंटरनेटशी कनेक्ट होतो आहे हे जाणुन घेण्यासाठी आय पी अँड्रेसचा वापर केला जात असतो.

आयपी अँड्रेस हा पुढील काही फाँरमँटमध्ये दिलेला असतो-

202.4.102,55

3AA:FF:FE27:8C4A

इंटरनेटशी कनेक्ट होत असलेल्या प्रत्येक मोबाईल,लँपटाँप,कंप्युटरची लोकेशन ट्रँक करण्यासाठी आयपी अँड्रेसचा वापर करतात.

9) आय एसपी :

 आय एसपीचा फुल फाँर्म (internet service provider) असा होत असतो.

इंटरनेटची सर्विस युझ करण्यासाठी आपल्याला एका इंटरनेट सर्विस प्रोव्हाईडरची आवश्यकता असते.

आय एस पी ही एक अशी इंटरनेट सर्विस देणारी एक कंपनी तसेच संस्था जी आपल्याला इंटरनेटशी कनेक्ट करत असते.

10) राऊटर :राऊटर हे एक सेंट्रल लोकेशन हार्डवेअर  डिव्हाईस तसेच मोडेम असते.हे आपल्या इंटरनेट सर्विस प्रोव्हाईडरवरून आपल्या घरात तसेच व्यवसाय क्षेत्रात येत असलेल्या नेटवर्क सिगनलसाठी ट्रँफिक काँपची भुमिका बजावत असते.

See also  घर गृहिणींसाठी करिअरचे 10 उत्तम पर्याय  - Career Options For Housewives Marathi

राऊटर्समुळे हंँकर्सपासुन देखील आपल्या डेटाचे संरक्षण होत असते.कारण हे आपल्या डेटाला डायरेक्टली आपल्या सिस्टमकडे तसेच प्रिंटरकडे लोकेट करत असते.

11) ईमेल :

ईमेलचा फुल फाँर्म हा (electronic mail) असा असतो.

ईमेल हा एक इलेक्ट्राँनिक मेल तसेच एक मँसेज असतो जो एका इलेक्ट्रानिक डिव्हाईसवरून दुसरया इलेक्ट्राँनिक डिव्हाईसकडे सेंड तसेच रिसिव्ह केला जात असतो.

यात आपण आपले महत्वाचे मँसेजेस,डाँक्युमेंट,फाईल तसेच आँफिशिअल काँन्फिडेंशल डेटा सेंट तसेच रिसिव्ह करत असतो.

12) ईमेल स्पँमिंग अँण्ड फिल्टर :

 आपल्या ईमेल आयडीवर नको असलेले बिन महत्वाचे जे अँडव्हटाईजिंग तसेच हँकिंगच्या उददिष्टाने जे ईमेल पाठवले जातात त्यांना स्पँम ईमेल असे म्हणतात.

आणि फिल्टरींग हे एक साँफ्टवेअरचा वापर करत असते जे आपल्या सर्व ईमेल्सला रीड करते आणि त्यातील अशाच नको असलेल्या अनवाँन्टेड ईमेल्सला फिल्टर करून अलग ठेवत असते.

आणि हे सर्व फिल्टर केलेले ईमेल पाहण्यासाठी आपण स्पँम किंवा जंक फोल्डरमध्ये जाऊ शकतो.

13) सोशल मिडिया :

 सोशल मिडिया हे एक असे ओपन पब्लिक प्लँटफाँर्म आहे जिथे आपण कोणाशीही आणि कुठल्याही देशातील व्यक्तीसोबत आँनलाईन चँट करू शकतो त्याला फ्रेंड रिक्वेस्ट टाकु शकतो त्याच्याशी कम्युनिकेट करू शकतो.

तसेच आपले फोटो व्हिडिओ ह्या सोशल मिडिया प्लँटफाँर्मवर आपण पब्लिकली पब्लिश करून इतरांसोबत शेअर करू शकतो.

सोशल मिडिया प्लँटफाँर्ममध्ये युटयुब,फेसबुक,व्हाँटस अँप,इन्स्टाग्राम,लिंक्ड ईन,क्वोरा टविटर इत्यादी लोकप्रिय सोशल मिडिया साईटसचा समावेश होतो.

14) काँमर्स :

 ई काँमर्सचा फुलफाँर्म इलेक्ट्राँनिक काँमर्स असा होत असतो.

ई काँमर्सचा वापर करून आपण आँनलाईन कुठल्याही प्रोडक्ट,वस्तुची बाईंग तसेच सेलिंग करू शकतो.

अँमेझाँन,फ्लीपकार्ट,अलिबाबा इत्यादी अशा अनेक ईकाँमर्स वेबसाईट तसेच अँप्स इंटरनेटवर आज उपलब्ध आहेत ज्यांचा वापर करून आज आपण आँनलाईन कुठलीही वस्तु प्रोडक्ट बाय किंवा सेल देखील करू शकतो.

15) इनक्रिप्शन आँथेंटिकेशन :

 इनस्क्रिप्शन ही एक अशी मेथड आहे.जिचा वापर करून आपण आपल्या प्रायव्हेट डेटाला इनक्रिप्ट करत असतो.जेणेकरून कुठलाही बाहेरचा व्यक्ती तो डेटा रिड तसेच अँक्सेस करू शकणार नाही.फक्त आँथेंटिकेट पर्सनलाच तो डेटा अँक्सेस तसेच रीड करता येत असतो.

आज आँनलाईन बँकिंग तसेच आँनलाईन खरेदी विक्रीमध्ये बायर्सचा डेटा गुप्त आणि सिक्युअर ठेवण्यासाठी इनस्क्रिप्शन मेथडचाच वापर केला जात असतो.

See also  आँक्शन म्हणजे काय? Auction meaning in Marathi

16) डाऊनलोडिंग :

डाऊनलोडिंग ही एक अशी मेथड आहे जिचा वापर वापर करून आपण इंटरनेटवरील कुठलाही फोटो तसेच व्हिडिओ आँडिओ आपल्या डिव्हाईसमध्ये काँपी करू शकतो.

यात आपण विविध फोटो, व्हिडिओ,आँडिओ,अँप्स,फाईल,पिक्चरचे सांँग इत्यादी आपल्या डिव्हाईसमध्ये डाऊनलोड करू शकतो.

उदा.युटयुब गुगल हे दोन असे दोन प्रसिदध प्लँटफाँर्म आहे जिथुन आपण कोणताही कंटेट डाऊनलोड करून आपल्या मोबाईलमध्ये घेऊ शकतो.

फक्त फाईल किंवा डेटा जितका मोठा असतो तेवढा अधिक वेळ आपल्याला तो डाऊनलोड करायला लागत असतो.किंवा इंटरनेटच्या स्पीड नुसार देखील आपल्याला डेटा डाऊनलोड करायला वेळ लागत असतो.

17) क्लाऊड कंप्युटिंग :

 क्लाऊड कंप्युटिंग हे मेन फ्रेम कंप्यूटर माँडेलचे एक न्यु व्हरझन आहे.

क्लाऊड कंप्युटिंगचा वापर आपण आपला डेटा,फोटो,फाईल्स,डाँक्युमेंट आँनलाईन एका ठिकाणी स्टोअर करत असतो आणि नंतर तोच डेटा इमरजन्सीमध्ये कुठूनही आपल्या इतर डिव्हाईसवरुन अँक्सेस करत असतो.

18)  फायरवाँल :

फायरवाँल हे एक साँफ्टवेअर तसेच हार्डवेअर असते जे आपल्या डेटाला सिस्टमला हँकर्सपासुन व्हायरसपासुन वाचवित असते.

म्हणजे फायरवाँल ही एक भिंत असते आपल्या डेटा आणि हँकर्स यांच्यामधील जी आपल्या डेटाला हँकर्सपासुन सुरक्षित ठेवत असते.

19) मालवेअर :

 मालवेअर हे एक साँफ्टवेअर असते जे हँकर्सने हँकिंगसाठी डिझाईन केलेले असते.

मालवेअरमध्ये विविध व्हायरस,कि लाँगिग,झोंबी प्रोग्रँम्सचा समावेश होत असतो.जे आपला डेटा चोरण्याचे,हँक तसेच क्रँक करण्यासाठी तयार केलेले असते.

20) ट्रोजन :

ट्रोजन हा एक हँकिगसाठी तयार केलेला प्रोग्रँम तसेच साँफ्टवेअर असते.जे युझर्सला इन्व्हाईट करून त्यांचा डेटा हँक करण्यासाठी वापरले जाते.

यात एखादी फाईल लिंक किंवा अँप्सचा समावेश होत असतो ज्यात आपण त्या लिंकवर क्लीक केल्यावर आपल्या डेटाचा कंट्रोल समोरच्या हँकर्सने तयार केलेल्या प्रोग्रँमद्वारे हँकर्सकडे जात असतो.

21) फिशिंग :

यात आपल्याला आपला बँक अकाऊंट नंबर,पासवर्ड पिन नंबर इत्यादी बँक डिटेल प्राप्त करण्यासाठी विविध प्रलोभने दिली जातात.आमिषे दाखवली जातात.

तसेच बँकेतुन फोन करत असल्याचे भासवून आपल्याकडून आपली बँकिंग डिटेल पिन नंबर पासवर्ड प्राप्त करण्याचा हँकर्सकडुन प्रयत्न देखील केला जात असतो.

22) ब्लाँग्स :

ब्लाँग हे एक असे एक आँलाईन प्लँटफाँर्म असते जिथे आपण आपले विचार नाँलेज इतरांसोबत टेक्सच्या फाँरमँटमध्ये शेअर करत असतो.यात आपण कोणत्याही अशा नीशवर इनफरमेशन लिहु शकतो ज्याचे आपल्याला उत्तम नाँलेज आहे ज्याचा आपण सखोल अभ्यास केलेला आहे तसेच अनुभव घेतलेला आहे.

1 thought on “Internet वापरातील नेहमी येणारे कॉमन शब्द -common useful internet terms for beginners”

Comments are closed.