Dropshipping म्हणजे काय ? जाणून घ्या ८ महत्वाचे मुद्दे

DropShipping म्हणजे काय ?

DropShipping म्हणजे  काय ?

DropShipping म्हणजे  हा एक असा व्यवसाय आहे ज्यात उत्पादनं किंवा सेवा आपल्या स्टोअर हाऊस मध्ये न ठेवता , बाळगता ह्यात ग्राहकाकडून आलेली सेल्स ऑर्डर किंवा खरेदी सूचना ही तिसर्‍या पक्षा कडे म्हणजेच एका करार केलेल्या कंपनी कडे दिली जाते व ती कंपनी पुढे पॅकिंग आणि शिपिंग , डिलीवरी ची जबाबदारी घेवून ग्राहकांना त्या सेल्स ऑर्डर नुसार उत्पादनं किंवा सेवा पोहचवते

DropShipping म्हणजे काय? मराठीत माहीती

कोणत्याही व्यक्तीसाठी स्वतचा एकादा चा व्यवसाय सुरू करणे  एक खुप योग्य पाऊल असते.स्वतचा  व्यवसाय ज्यात आपण आपले प्रोडक्ट तसेच सर्विस (उत्पादनं आणि सेवा )आँनलाईन विकु शकु असे खूप जणांच स्वप्न असते

असाच एक व्यवसाय आहे ड्रॉप शिपिंग ,यात आपण आपल्या मर्जीनुसार प्रोडक्टची ((उत्पादनं आणि सेवा ))निवड करून आपल्या हिशोबानुसार त्याची किंमत ठेवू शकत असतो.अणि DropShipping ह्या व्यवसायात सर्वात चांगली गोष्ट ही आहे की ह्यात आपल्याला कोणत्याही प्रोडक्ट तसेच सर्विसचा साठा किंवा संग्रह आपल्याजवळ बाळगण्याची आवश्यकता नसते म्हणजे स्टोअर होऊस ची गरज नसते .

अणि आपण चांगल्या प्लॅनिंग जर हे काम केले तर DropShipping व्यवसायात आपण स्वताचा ब्रँण्ड तयार करून चांगला पैसा देखील कमवू शकतो.

जर आपल्याला अगदी सोप्या पदधतीने DropShipping चा व्यवसाय सुरू करायचा आहे तसेच तो शिकायचा आहे तर आपण सर्वजण योग्य ठिकाणी आलेले आहात.

 कारण आजच्या ह्या लेखात आपल्याला DropShipping विषयी सर्व माहीती आम्ही देणार आहोत. खाली दिलेल्या एक एक मुद्द्यनावर आपण सविस्तर समजून घेणार आहोत ,उद्देश हा की जेणेकरून आपणही Drop Shipping चा व्यवसाय खुप सहजपदधतीने सुरू करू शकाल.

  • DropShipping म्हणजे काय ?
  • DropShipping व्यवसायाचे फायदे कोणकोणते?
  • DropShipping व्यवसायात येत असलेल्या समस्या कोणकोणत्या?
  • DropShipping चा व्यवसाय कसा सुरू करायचा?
  • DropShipping चे Model कसे काम करते ?
  • भारतामधील DropShipping चा व्यवसाय
  • DropShipping दवारे पैसे कसे कमवावे?
  • DropShipping करताना घ्यायची काळजी?

1)Drop Shipping म्हणजे काय ?

 Drop Shipping हा एक असा व्यवसाय आहे ज्यात आपण एक आँनलाईन स्टोअर तयार करून आपल्या उत्पादनं आणि सेवा (प्रोडक्ट तसेच सर्विसला) आँनलाईन विकू शकत असतो.

अणि यात आपल्याला कोणत्याही (उत्पादनं आणि सेवा )प्रोडक्ट तसेच सर्विसची खरेदी करून आपल्याजवळ त्याचा संग्रह करण्याचीही आवश्यकता भासत नाही.कारण ह्यात जेव्हा आपण एखादा प्रोडक्ट तसेच सर्विस विकत असतो तेव्हा आपला Supplier त्या वस्तु,प्रोडक्ट तसेच सर्विसला आपल्या Customer पर्यत पोहचवत असतो.यात आपल्याला प्रोडक्टची खरेदी करून तो Inventory मध्ये ठेवण्याची तसेच त्याची Packaging, Delivery करण्याची चिंता करण्याची गरज आपल्याला पडत नाही.यालाच Drop Shipping Business असे म्हटले जाते.

See also  Pi Bot - हयुमनाॅईड पायलट पिबोट - मानवीय रोबोट उडवणार विमान

2)DropShipping व्यवसायाचे फायदे कोणकोणते?

  • कमी खर्च :ह्या व्यवसायात आपल्याला खुप कमी कमी पैशांची गुंतवणुक तसेच खर्च करावा लागतो.कारण ह्या व्यवसायात आपल्याला वस्तुंची खरेदी करून आपल्याजवळ त्याचा संग्रह बाळगण्याची गरज नसते स्टॉक करणे गरजेचं नसत .ज्यामुळे यात आपला कमी खर्च ह्या व्यवसायात होत असतो.यात फक्त आपल्याला आपले स्वताचे एक आँनलाईन स्टोअर बनवावे लागत असते.त्याचा खर्च करावा लागत असतो.
  • व्यवसाय चालणे सोप्पे:DropShipping व्यवसायात वस्तुंची,प्रोड्कटची,सर्विसची देवान-घेवान करावी लागत नसते.याच्याने हा व्यवसाय अगदी सोप्पा होऊन जातो कारण यात आपल्याला वस्तुची खरेदी करून त्याचा संग्रह देखील बाळगावा लागत नसतो.
  • सर्वात महत्वाचे म्हणजे Warehouse ची आवश्यकता पडत नसते.ज्यामुळे आपल्या वेळेची,मेहनतीची तसेच पैशांची देखील बचत यात होत असते.
  • आपल्याला वस्तुंना Pack करण्याची तसेच पाठवण्याची गरज पडत नसते.
  • वस्तु,प्रोडक्ट तसेच सर्विसच्या संग्रहाची चिंता राहत नसते.
  • कुठलीही वस्तु,प्रोडक्ट तसेच सर्विस वापस आल्यावर चिंता करावी लागत नसते.
  • जागेचे स्वातंत्र:  Drop Shipping ह्या व्यवसायात आपल्याला जागेचे स्वातंत्र असते हा व्यवसाय आपण कुठेही बसुन Internet दवारे करू शकत असतो.बाकी व्यवसायांसाठी आपल्याला ठाराविक जागेचे बंधन असते त्याठिकाणी जाऊनच आपल्याला तो व्यवसाय करावा लागत असतो पण Drop Shipping चे तसे नसते.यात तुम्ही कुठूनही फक्त Internet दवारे काम करू शकतो.
  • अधिकाधिक उत्पादनाची निवड : Drop Shipping हा एक असा व्यवसाय आहे ज्यात आपल्याला वस्तुंचा संग्रह जवळ बाळगावा लागत नसतो त्यामुळे ह्या व्यवसायात आपण अधिकाधिक वस्तुंची निवड करून आपल्या व्यापार तसेच व्यवसायात वाढ करू शकतो.

3) DropShipping व्यवसायात येत असलेल्या समस्या कोणकोणत्या?

 ज्या पदधतीने प्रत्येक व्यापार तसेच व्यवसायात काहीतरी अडीअडचणी तसेच समस्या असतात.त्याचप्रमाणे Drop Shipping ह्या व्यवसायात देखील काही समस्या आहेत ज्या आपण जाणुन घेणार आहोत.

  • Low Profit Margin : Drop Shipping हा व्यवसाय सोप्या पदधतीचा असल्यामुळे खूप जण आज हा व्यवसाय करीत आहे.ज्यामुळे ह्या व्यवसायात आज स्पर्धा खुपच वाढली आहे अणि त्यामुळे ह्यातील Profit Margin देखील कमी झालेला आपणास दिसुन येतो.
  • Problem Of Product Availability:समजा आपण आपल्याजवळ आपल्या सर्व वस्तु,प्रोडक्ट तसेच सर्विसला संग्रहित करून ठेवले तर आपल्याला माहीत असते की किती वस्तु,प्रोडक्ट तसेच सर्विसची आपल्याला गरज आहे अणि त्यातल्या किती वस्तु,प्रोडक्ट तसेच सर्विस आपल्या संग्रहात आहे.
  • पण Drop Shipping व्यवसायामध्ये आपण कोणत्याही वस्तु,प्रोडक्ट तसेच सर्विससाठी Supplier वर पुर्णपणे अवलंबुन असतो.अणि कधीकधी Supplier कडे वस्तु,प्रोडक्ट तसेच सर्विसचा संग्रह उपलब्ध नसल्यामुळे
  • आपल्याला ती वस्तु प्रोडक्ट तसेच सर्विसचा संग्रह पुन्हा येईपर्यत वाट पाहावी लागत असते.कारण आपण स्वता तो Manage करू शकत नसतो.

4) DropShipping चा व्यवसाय कसा सुरू करायचा?

DropShipping चा व्यवसाय सुरू करण्यासाठी काही महत्वाच्या Steps आहेत ज्या आपण DropShipping चा व्यवसाय करण्यासाठी Follow करणे फार गरजेचे आहे.

 1)  सर्वात आधी Product तसेच Service ची निवड करणे:

आपण काय विकतो हे खुप महत्वाचे असते.यासाठी आपण असा (उत्पादनं आणि सेवा ) प्रोडक्ट तसेच सर्विस निवडायला हवी ज्याची खरेदी विक्री मार्केटमध्ये अधिक होते.अणि ज्याचा मार्केटमधील लोकांना म्हणजे आपल्या Customer ला अधिक लाभ देखील होईल.त्यासाठी आपण मार्केटमध्ये Research करणे देखील फार गरजेचे आहे.

See also  गूगल बार्ड - गृहिनींपासून तर विद्यार्थी ,नोकरदार सर्वां करता एक वरदानच! WHAT IS GOOGLE BARD

 खुप लोकांचे असे म्हणने असते की आपल्याला ज्याविषयी माहीती असते तसेच आवड देखील असते असेच Product तसेच Service आपण इतरांना विकायला हवे किंवा विकत घेण्यासाठी सुचवायला हवे पण मला असे वाटते की आवड अणि माहीतीबरोबरच आपण जो Product तसेच Service इतरांना विकत असतो तो त्यांच्यासाठी लाभदायक देखील असायला हवा.त्या त्या Product तसेच Service मुळे आपल्या Customer च्या Life मध्ये Value Add झाली पाहिजे त्याला त्याच्यापासुन भरपुर नफा प्राप्त झाला पाहिजे किंवा त्या उत्पादनं मुळे ग्राहकच्या अडचणी सोडवता आल्या पाहिजेत

 आपल्याला Trending Product, Service कडे देखील लक्ष देणे फार गरजेचे आहे.कारण मार्केटमध्ये वेळेनुसार Product तसेच Service चा Trend हा बदलत असतो.तसेच कोणत्याही Product तसेच Service ची निवड करताना त्याच्यासाठी मार्केटमध्ये चालत असलेली स्पर्धा पण आपण लक्षात घ्यायला हवी कारण ज्या Product तसेच Service विषयी मार्केटमध्ये जास्त स्पर्धा असते तो विकणे पण खुप अवघड जात असते.

2) आपल्या Product तसेच Service विषयी मार्केटमध्ये चालत असलेली स्पर्धा लक्षात घेणे :

   जेव्हा आपण एखाद्या Product तसेच Service ची निवड करत असतो तेव्हा आपल्याला Market मध्ये त्या Product तसेच Service विषयी चालत असलेल्या स्पर्धेविषयी जाणुन घेणे पण गरजेचे असते.आपला काय विकतो आहे?कशापदधतीने विकतो आहे?त्याची Marketing ची Strategy काय आहे?हे देखील आपण समजुन घेणे गरजेचे असते.

हे आपण खालील अनेक पदधतीने समजुन घेऊ शकतो.

  • यासाठी आपण गुगलवर आपल्या Product तसेच Service विषयी Search करू शकतो.अणि सुरूवातीला रॅंक करत असलेल्या पाच वेबसाईटला Analyze करू शकतो.
  • गुगलवर टाँप 5 ला रँक करत असलेल्या वेबसाईटच आपले खरे Competitors असतात.त्यामुळे आपण त्यांच्याविषयी Research करणे देखील फार गरजेचे आहे.
  • कारण जर आपल्याला अशा ठिकाणी आपले  Product तसेच Service विकायची आहे जेथील आपल्या Competitors बददल आपल्याला काहीच माहीती नाही तर मग आपल्याला आपल्या Competitors चा छडा लावण्यासाठी काही Software Tools असतात ज्यांचा वापर करावा लागेल.

3) Product तसेच Service Supplier (उत्पादनं आणि सेवा ) शोधणे:

 Drop Shipping हा एक असा व्यवसाय आहे ज्यात Supplier शोधणे हे फार अवघड काम असते.पण अशी सुदधा काही Platforms आहेत जिथे आपण सहजपणे Supplier ला शोधु शकत असतो.

  • अशी सुदधा काही Platforms आहेत जिथे आपण आपल्या Product तसेच Service विषयी Search करून त्याच्या Suppliers ची यादी मिळवु शकत असतो.
  • मग आपण आपल्याला जो Supplier हवा असेल त्याच्याशी संपर्क साधुन विचारू शकतो की त्यांची Product तसेच Service ची Quality कशी आहे?
  • त्यांची Minimum Order Quantity काय आह?त्यांचा Shipping Charge काय आहे?
  • त्यांना Shipping ला किती वेळ लागत असतो?
  • मग शेवटी 5 Supplier पैकी कोणतेही 1 किंवा 2Supplier Final करायचे अणि
  • त्यांना Sample म्हणुन एक Order द्यायची मग
  • यात जो Supplier वेळेत अणि Quality Product तसेच Service देईल त्याच्यासोबत काम करणे सुरू करायचे.त्यालाच आपला Supplier निवडायचे.

   4)Finally Drop Shipping Business साठी आपले एक Store तयार करायचे

 Drop Shipping हा एक असा व्यवसाय आहे ज्याची संकल्पणा E Commerce शी जोडली गेलेली आहे.Drop Shipping व्यवसायासाठी आपल्याला एका वेबसाईटची आवश्यकता असते.जी आपण एखाद्या Web Developer कडुन देखील बनवुन घेऊ शकतो.

See also  जगातील पहिल्या शंभर टक्के इथेनॉल वर चालणारया कारचे फायदे तसेच वैशिष्ट्य काय आहेत? World first ethanol car benefits and features

 किंवा आपण Shopify वरून वेबसाईट बनवू शकतो.Shopify ही एक अशी वेबसाईट आहे जी आपल्याला आपली स्वताची एक E-Commerce Website तयार करण्यास मदत करत असते.व आपल्याला आपले स्वताचे एक आँनलाईन स्टोअर देत असते जिथुन कोणीही आपल्या वेबसाईटवर आँडर्र Place करू शकते.

5) अणि मग आपल्या Product तसेच Service ची Online Store ची Marketing करायची

आपले Online Store तयार झाल्यावर पुढचे काम असते त्या Online Store ची Marketing करण्याचे लोकांपर्यत ते पोहचवण्याचे.त्यासाठी आपण खालील Adds चा वापर करू शकतो.

  • Face Book Add
  • Google Add
  • Influencer Marketing Etc

 6) Product Services चे Optimization

आपला Drop Shipping चा व्यवसाय सुरू होऊन त्यातुन विक्री होऊन नफा येणे सुरू झाल्यानंतर आपण आपल्या सर्व Product Services ला Analyze करायचे असते म्हणजे हे जाणुन घ्यायचे असते की आपले कोणते Product तसेच Service जास्त विकले जाते आहे?कोणती Marketing ची पदधत आपली योग्य आहे अणि कोणती अयोग्य आहे?अणि मग त्यानुसार आपल्याला आपल्या Marketing Strategies मध्ये बदल करत राहावे लागतात.

5). DropShipping चे Model कसे काम करते ?

Drop Shipping हे एक असे Model आहे ज्यात Manufacturer, Retailer अणि Customer ह्या तीन लोकांचा मुख्य रुपाने समावेश असतो.

  • यात पहिला Manufacturer असतो ज्याचे काम Product तसेच Service बनवुन आपल्या Product तसेच Service च्या संग्रहामध्ये ठेवणे अणि Customer कडे पाठविणे हे असते.
  • अणि दुसरा Retailer असतो ज्याचे काम हे Online Store बनवुन Product तसेच Service ला वेबसाईटवर List करणे अणि जाहीरात करून विकणे हे असते.
  • अणि तिसरा Customer असतो ज्याचे काम त्या Product तसेच Service ला विकत घेऊन आपल्या उपयोगात आणने हे असते.

 6) भारतामधील DropShipping चा व्यवसाय

  • भारतातील Drop Shipping च्या व्यवसायाविषयी सांगायचे म्हटले तर E- Commerce व्यवसाय सुरू करण्यासाठी नवीन उद्योजकांकासाठी भारतामध्ये Drop Shipping एक सोप्पा अणि सहज मार्ग आहे.
  • भारतातील E-Commerce विक्रीचे प्रमाण हे दिवसेंदिवस वाढू राहिले.अणि ही एक खुप चांगली संधी आहे.आँनलाईन विक्री करत असलेल्या विक्रेत्यांसाठी.अणि आपण अशी आशा बाळगु की हे E Commerce विक्रीचे प्रमाण भविष्यात भारतामध्ये वाढतच जाईल.
  • भारतातील Top 10 Drop Shipping कंपन्या
  • Baapstore
  • Trade India
  • Just Dial
  • Bluember
  • Indiamart
  • Jim Trade
  • Trade Ford
  • Exports India
  • Web Deal India
  • Hothaat

7) DropShipping दवारे पैसे कसे कमवावे?

Drop Shipping व्यवसायात आपल्या ज्या Product तसेच Service ला Customer खरेदी करीत असतात.

त्याच Product तसेच Service मधुन आपल्याला नफा प्राप्त करायचा असतो.म्हणजे समजा एखाद्या Product तसेच Service ची किंमत जर 100 रुपये आहे तर आपण ती Customer ला 120 रुपयांमध्ये विकू शकतो.म्हणजे त्या Product तसेच Service वर आपल्याला 20 रूपयाचा Profit Margin निघत असतो.

यासाठी आपण त्या Product तसेच Service ची मुळ किंमत आहे त्यापेक्षा थोडया जास्त किंमतीत ती विकायला हवे याने आपल्याला आपला Profit Margin मिळुन जात असतो.यात पण काही कंपन्या शिपिंगचा चार्ज अलग लावत नसतात आहे त्याच किंमतीत शिपिंग देत असतात पण काही कंपन्या शिपिंगचा वेगळा चार्ज घेत असतात.त्याचे पैसे आपल्याला आपल्या उत्पादनातुन द्यावे लागत असतात.तर काही कंपन्या Customer कडुनच शिपिंगचा चार्ज घेत असतात.

उदा Mesho,India Shop 101, इत्यादी कंपन्या Drop Shipping Model वर काम करतात.

8) DropShipping करताना घ्यायची काळजी?

  • आपल्या वेबसाईटवर विक्रीसाठी असलेले सर्व Product तसेच Service उच्च दर्जाचेच असायला हवेत.
  • आपल्या कोणत्याही Customer सोबत आपल्याकडून किंवा आपल्या Supplier कडुन कुठल्याही प्रकारचे गैरवर्तन व्हायला नको याची काळजी घ्यायची.
  • खुप Customer च्या ह्या तक्रारी असतात.की त्यांना ठरल्या प्रमाणे पाहिजे तसा Product तसेच Service प्राप्त झाली नाही.किंवा तो वेळेत त्यांना मिळाला नाही तसेच त्याच्या Exchange मध्ये खुप अडचणी असतात ह्या सर्व गोष्टींकडे पण आपण लक्ष देणे फार आवश्यक असते.

9) अंतिम निष्कर्ष :आपण DropShipping म्हणजे काय? आणि संभाव्य व्यवसाय संधि बद्दल सखोल, सविस्तर माहिती घेण्याचा प्रयत्न केला, काही प्रश्न असल्यास नक्की कॉमेंट्स करा.

2 thoughts on “Dropshipping म्हणजे काय ? जाणून घ्या ८ महत्वाचे मुद्दे”

Comments are closed.